शिक्षण विभागाच्या बदल्यांमधील अनियमिततेची चौकशी करा : जि.प सदस्या माधुरी अत्तरदे यांची सीईओंकडे मागणी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदल्या तसेच जिल्हा अंतर्गत बदल्यांमधील नियमांची पायमल्ली होत असल्याचे निर्देशनास आले असून या बदल्यांमधील अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदच्या सदस्या माधुरी अत्तरदे यांनी आज सीईओंना दिले.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया फक्त ऑनलाईन करण्याचे शासनाचे आदेश होते. परंतु याप्रकारे बदल्या न करता सीईओ यांच्या अनुपस्थितीत शिक्षण विभागाने काही शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

यात अर्थिक देवाण-घेवाण देखील झाली असल्याचे माधुरी अत्तरदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. २७ फेब्रुवारीच्या शिक्षक संवर्गाबाबत नवीन निकष व तरतुदीच्या अनुषंगाने बदल्या करावयाच्या असतांना देखील जुन्या शासन निर्णयानुसार गणपत वाल्हे यांची रावेर तालुक्यातील चोपडा तालुक्यात बदली करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाकडून सर्रासपणे शासन आदेशाची पायमल्ली होत असून नियमबाह्य शिक्षण विभागाच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

*