बुलढाणा येथे नियुक्तीस असलेल्या जळगावच्या पोलिस निरिक्षकासह पोलिस नाईकास लाच घेतांना अटक

0
मलकापूर | प्रतिनिधी : मलकापुर शहर पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले व जळगाव येथील रहीवासी असलेले पोलिस निरीक्षक दिपक रामकृष्ण कोळी व पोलिस नाईक रतीलाल शंकर नवले यांना ३५००० हजार रूपयांची लाच घेतांना बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

याबाबत लाचलूचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या प्रसिध्द पत्रकानुसार तक्रारदार योगेश सुरेशराव सावरकर (वय ३३) व्यवस्थापक आनंद मेला व स्वयंम रोजगार प्रर्दशनी, रा. आकोट, जि. अकोला यांनी गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या खुल्या मैदानावर आनंद मेला लावण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र तसेच लाऊडस्पिकर लावण्यासाठीची परवानगी मागीतली होती.

सदर परवानगी देण्यासाठी मलकापुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक रामकृष्ण कोळी (रा. गायत्री नगर, शिरसोली रोड जळगाव,हमु.विष्णू विहार अपार्टमेंट मलकापुर) यांनी१ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार तक्रारदार सावकर यांनी दिली.

त्याची पडताळणी १ मे रोजी करण्यात आली. यात कार्यवाहीत पोलिस नाईक रतीलाल शंकर नवले यांनी ठाणेदार दिपक कोळी यांच्या वतीने ३५ हजाराची लाच मागितली.

दि. २ मे रोजी पुन्हा पडताळणी केली असता पोनि. दिपक कोळी यांनी श्री. नवले यांच्या सांगण्यानुसार ३५ हजार लाचेची मागणी केली.

त्यानंतर दि ३ रोजी सापाळा लावून पोलिस निरीक्षक दिपक कोळी यांनी पोलिस स्टेशनच्या आवारातील पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात बसून लाचेची रक्कम ३५ हजार रूपये पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहात पकडले.

याकामी महेश चिमटे पोलिस अधिक्षक, विलास देशमुख अपर पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक विलास पाटील, पोनि.एस.बी. भाईक, एएसआय शाम भोगे, कॉन्स्टेबल रविंद्र लवंगे, पोना. संजय शेळके, सुखदेव ठाकरे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

*