पोलिस पाटलांकडून लाच : पारोळ्याचा विद्यूत सहाय्यक झाला गजाआड

0
पारोळा : प्रतिनिधी | मोंढाळे येथील पोलिस पाटलांकडून २६०० रूपयांची लाच घेतांना मोढाळा प्र.उ. येथील विद्युत सहाय्यक गितकुमार शिरसाठ यांना लाच लूचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांची मोंढाळे प्रउ. येथे शेती आहे.शेजारच्या शेतातील वीजेच्या खांबावरून वीज घेवून त्यांच्याच विहिरीतील इलेक्ट्रिक मोटारीने शेतात पाणी भरतात.

मोंढाळा प्र.उ.येथील विद्युत सहाय्यक गितकुमार शिरसाठ याने तक्रारदारांच्या शेतात येत त्यांचे व त्यांच्या चुलत भावाच्या शेतातील वीजेच्या खांबावरील वीज कनेक्शनची वायर काढून घेवून गेले.

वीजेबाबतची संभाव्य कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाकडून प्रत्येकी १३०० असे एकूण २६०० रूपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती. .

त्यानुसार तक्रारदारांनी धुळ्याच्या लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करून मोंढाळे प्रउ. येथील बस स्टॉपजवळ सापाळा लावण्यात आला. त्यात विद्युत सहाय्यक गितकुमार हरी शिरसाठ (वय २३) यांना २६०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले व पोलिस उपअधिक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महेश भोरटेकर,पोनि.पी.पी. देसले, संदीप सरग, देवेंद्र वेंन्दे,संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतिष जावरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार व प्रशांत चौधरी यांनी केली.,

LEAVE A REPLY

*