जळगाव पीपल्स बँकेचा ‘सहकारश्रेष्ठ’ पुरस्काराने गौरव

0
जळगाव | | प्रतिनिधी : दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक आहे. ८४ वर्षांच्या परंपरेत बँकेस अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

नागपूर येथील नचिकेत प्रकाशन या संस्थेतर्फे बँकेला सहकार श्रेष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजसेवक तथा आनंदवन येथील सचिव महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला.

नचिकेत प्रकाशनाने महाराष्ट्रात नागरी बँका आणि पतसंस्था यांच्यासाठी राज्यस्तरीय अहवाल, तंत्रज्ञान वापर, ग्राहकसेवा आणि सेवाकार्य यासारख्या विविध विभाग व निकषांव्दारे पुरस्काराचे आयोजन व प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास बँकेचे जेष्ठ संचालक डॉ.सी.बी.चौधरी, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, डॉ.सुहास महाजन,अनिकेत पाटील व बँकेचे अधिकारी उमेश अहिरराव हे उपस्थित होते.जळगाव पीपल्स बँकेस शेड्युल गटातून संपूर्ण महाराष्ट्रातुन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बँकेच्या एकुण ४० शाखा आहेत. बँकेने मल्टी-स्टेट आणि शेडयुल्डमेंट दर्जा प्राप्त केलेला आहे. त्यांचा नाविन्यतेचा ध्यास व परिपूर्णतेची कास तसेच उच्चतम ग्राहकसेवा या मुलमंत्रामुळे बँक इतर सहकारी बँकांपेक्षा सरस ठरत आहे. कुशल कर्मचार्‍यांशिवाय बँक प्रगती करु शकत नाही याची अचूक जाण असल्याने त्यांनी कर्मचार्‍यांसाठी बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रशिक्षणांचा पायंडा घातला.

कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, प्रत्येक कर्मचार्‍यास बँकिंगमधील विविध प्रशिक्षण संस्थांमार्फत तसेच रिझर्व बँकेच्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून कर्मचार्‍यांची कार्यकुशलता वाढवली.

बँकेच्यावतीने ग्राहकांना अनेक सेवासुविधा पुरविण्यात येत आहे. तत्पर बँकिंग सेवासुविधा व उत्कृष्ट व्यवस्थापनव्दारे बँकेस हे यश प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

*