मृग नक्षत्रात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज

0
निपाणे, ता.एरंडोल | वार्ताहर :  रोहीणी नक्षत्राच्या शेवटी पूर्व मौसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी चांगल्या प्रकारे शेती मशागतीची कामे करून मृगाच्या सुरूवातीला कोरडवाहू कापसाची लागवड केली.

यंदा पावसाची सुरूवात चांगली झाली असून मृगाच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने कपाशी लागवडसह ज्वारी, सोयाबीन, उडीद, मुग, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. तर काही शेतकरी पेरण्या करत आहेत.

मृगाच्या शेवटी संपूर्ण पेरण्या पूर्ण होतील. बळीराजाला चांगले दिवस येतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे. मृग नक्षत्रात पेरण्या झाला तर पिक निरक येवून चांगले उत्पन्न देवून जाते असा अंदाज शेतकरी लावतात. त्याप्रमाणे यावर्षी पावसाची सुरूवात चांगली झाली आहे.

यापुढे दमदार पावसाची शक्यता हवामन खात्याने वर्तविली असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनेन शेतकर्‍यांना कर्ज माङ्गी देवून दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले होते की जे शेतकरी पिक कर्ज भरून बँकेला सहकार्य करतील त्यांनाही कर्ज माङ्गी लाभ दिला जाईल. आता कर्ज भरणारे संभ्रमात पडले असून त्यांनी नव्याने विकासो मार्ङ्गत कर्ज घेतले आहे. ते माङ्ग होवून शेतकर्‍यांना नव्याने कर्ज केव्हा मिळणार याकडे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षाचे पिक कर्ज भरून अनेक शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली. १ लाख भरणार्‍यांना ङ्गक्त ७० हजार कर्ज मिळाले. सावकाराला १५ ते ३० दिवसाचे व्याज देवून काहींनी जुने, नवे कर्ज केले.

मात्र कर्ज भरणारे ङ्गसले. यंदा वाढवून कर्ज न मिळता शेतकर्‍यांना कमी कर्ज मिळाले. त्यातच भरणारे लोक सधन असतात असा पवित्रा काही राजकीय नेते घेतात.

परंतु कर्ज भरणारा शेतकरी हा सावकाराकडून व्याजाने पैसे काढून सोसायटी जुनी नवी करत असतो. आपली क्रिडेट राहावी व आपणास बोनस मिळावा यासाठी घेतलेले कर्ज तो ङ्गेडत असतो. या शेतकर्‍यांना वेगळे निकश लावण्याची गरज नाही.

सर्वच शेतकरी वर्गाने जर कर्ज भरण्याचे नाकारले असते तर जिल्हा बँक व शाखा ओस पडल्या असत्या. मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला शेतकरी बळी पडले आणि त्यांनी पिक कर्ज भरून जिल्हा बँकांना सहकार्य केले. त्याचे राजकारण होता कामा नये. कर्ज भरणार्‍या प्रामाणिक शेतकर्‍यांनाही कर्ज मुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*