बालवाडीतील ७० टक्के हजेरी असणार्‍या विद्यार्थीनींना ५०० रुपये शिष्यवृत्ती : मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभेत निर्णय

0
जळगाव |  प्रतिनिधी :  महापालिकेच्या बालवाडीत सन २०१६-१७ शैक्षणिक सत्रामध्ये ७० टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थीनींना ५०० रुपये वार्षीक शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला.

मनपा महिला बालकल्याण समितीची सभासभापती कांचन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजण सैंदाणे उपस्थित होते.

मनपाच्या शहरातील ३३ बालवाड्यांमधील २०१६-१७ वर्षातील ८११ विद्यार्थीनींपैकी ७० टक्के हजेरी व लसीकरण झालेल्या विद्यार्थींना ५०० रुपये शिष्यवृत्ती देणेबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

सभा सुरु झाल्यानंतर ज्योती चव्हाण या सभागृहात होत्या. त्यानंतर बालवाडी अधिक्षकांनी सायराबी सपकाळे, कंचन सनकत, संगीता दांडेकर, उज्वला बाविस्कर या सदस्यांना दुरध्वनी करुन बोलविल्यानंतर सभा संपताच त्या सभागृहात आल्यात.

त्यामूळे मनपा बालकल्याण समिती ही नावालाच असल्याची बोलले जात आहे. समीतीतील उर्वरीत सदस्या पार्वता भिल, सुभद्रा नाईक, जिजाबाई भापसे या अनुपस्थीत होत्या.

बालवाडी शिक्षीका, मदतनीस यांंच्या बदल्या – मनपाच्या ३३ बालवाड्या आहेत. यात २७ शिक्षीका आणि २३ मदतनीस असून त्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*