जामनेर तालुका दहावीच्या परीक्षेत अव्वल

0
जामनेर |  प्रतिनिधी : २०१७ मध्ये झालेल्या दहावी शालांत बोर्डाच्या परिक्षेत यंदाही जामनेर तालुका अव्वल स्थानावर राहीला.

न्यू इंग्लिश स्कुल शाळेच्या हर्षोधन पाटील व उर्मिला इंगळे या दोन विद्यार्थ्यांना गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले.

लिटील फ्लावर इंग्लिश मेडीयम स्कुल ची विद्यार्थींनी ऋतूजा मनोज विसपुते ९९.२० टक्के गुण मिळवून तिने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला.

कु.ऋतूजा ही डॉ.मनोज व डॉ.स्वाती विसपुते यांची कन्या असुन तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.८० टक्के लागला.विद्यालयातून कौशल संजय बरकले ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षल शिवाजीराव पालवे ९५.६० टक्के द्वितीय तर सौरभ गोकूळसिह घोटी ९३ टक्के मिळवून तिसरा आला.एकूण ३६४ विद्यार्थ्यांपैकी ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

 

 

इंदिराबाई ललवाणी संस्थेचे आधारस्तंभ माजी खा.ईश्‍वरबाबुजी जैन, अध्यक्ष माजी आम.दत्तात्रय महाजन,मधुकर महाजन, श्रीराम महाजन, रांजेद्र महाजन, किशोर महाजन, ङ्गकीरा धनगर,संजय महाजन, के.व्ही.महाजन, प्राचार्य व्हि.पी.पाटील, पी.एङ्ग चौधरी, पी.आर.वाघ, ए.बी.पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

न्यु इंग्लीश स्कूलचा निकाल ९२.५७ टक्के लागला असून सहाशिका सुनिल पाटील ९७ टक्के गुण मिळवून प्रथम आली.जयश्री विठ्ठल माळी ९६.४० टक्के गुण मिळवून दुसरी तर गौरव कैलास अवघडे ९५.८० टक्के गुण मिळवून तिसरा आला.

संस्थेचे अध्यक्ष आबाजी नाना पाटील, सचिव सुरेशचंद्र धारीवाल, मुख्याध्यापक डी.एस.पाटील, यांनी कौतुक केले.याच संस्थेच्या लिटील फ्लावर इंग्लीश मेडीयम स्कुलचा निकाल १०० टक्के लागला.

ऋतुजा मनोज विसपुते हिला ९९.२० टक्के गुण मिळवून ती शाळेतून व तालुक्यातून ही प्रथम आली.अनिकेेत संदीप महाजन ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर साक्षी प्रशांत उंबरकर ९४ टक्के गुण मिळवून तिसरी आली.

संस्थेचे सचिव सुरेशचंद्र धारीवाल यांनी कु.ऋतूजा विसपुते व तिचे वडील डॉ.मनोज विसपुते,डॉ.स्वाती विसपुते यांना पुष्प गुच्छ देवून कौतुक केले.शाळेच्या प्राचार्य एस.एस.देवरे यांनीही ऋतूजाचे कौतुक केले.

एकलव्य माध्यमिक विद्यालयातून सतीश सदराससिंग घोटी ८८.२० टक्के गुण मिळवून प्रथम, पवन मनोहर पर्वते ८७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, रूपाली शांताराम ऊंबरकर ८४ टक्के गुण मिळवून तृतीय आली.

संस्थेचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन, सचिव कडू माळी, मुख्याध्यापक देवीदास काळे, प्रा.सोनवणे यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.

कन्या माध्यमिक विद्यालयात रूपाली धनराज जाधव ८८.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली.

पुजा किशोर साठे ८१.६८ टक्के गुण मिळवून द्वितीय, संस्थेचे अध्यक्ष जी.एस.महाजन, सचिव दिलीप विठ्ठल महाजन, उपाध्यक्ष रणजित महाजन, मुख्याध्यापिका श्रीमती एस.आर.टोकणे यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक केले.शहरातील ऍग्लो उर्दु विद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला आहे.

LEAVE A REPLY

*