श्रीक्षेत्र पद्मालयाच्या ‘ब’ दर्जासाठी नियोजन मंडळात चर्चा करणार-जिल्हाधिकारी

0
जळगाव, |  प्रतिनिधी :  श्रीक्षेत्र पद्मालयाला ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी जिल्हा नियाजन मंडळाच्या सभेत चर्चा करु, तसेच त्यासाठी पाठपुरावा करु, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले.

श्रीक्षेत्र पद्मालय येथे दि. १३ रोजी अंगारक चतुर्थीनिमित्त ब्रम्हमुहुर्तावर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते महापूजेचे आयोजन विश्‍वस्त मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी मंदिरात केशव पुराणिक यांच्या पोैराहित्याखाली महापूजा करण्यात आली.

यावेळी श्री गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अमृत बुधो कोळी, विश्‍वस्त आनंदराव पाटील, ए.एल. पाटील, डॉ. पी.जी. पिंगळे, गोकुळ देशमुख, भिका महाजन, राजेश तिवारी, मंदिराचे पुजारी गणेश वैद्य, पो.नि. बाळासाहेब केदारे, तसेच अशोक पाटील, एस.व्ही. पाटील, कर्मचारी इरभान पाटील व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

यानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा विश्‍वस्त मंडळातर्फे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. निंबाळकर यांनी मंदिराच्या उत्पन्नाची बाजू, अंदाजपत्रक, अहवाल याबाबत माहिती जाणून घेतली. यावर्षी सन २०१७-१८ साठी ४७ लाखांचे अंदाजपत्रक पाठविण्यात आल्याचे श्री निंबाळकर यांना सांगण्यात आले.

यावेळी श्रीक्षेत्र पद्मालयाला ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी जिल्हा नियाजन मंडळाच्या सभेत चर्चा करु, तसेच त्यासाठी पाठपुरावा करु, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले. यावेळी अध्यक्ष अमृत बुधो कोळी, ए.एल. पाटील, डॉ. पी.जी. पिंगळे उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*