जगातील सर्वात उंच झोका !

न्यूयॉर्क | वृत्तसंस्था :  झोके, पाळणे यांचे आकर्षण केवळ लहान मुलांनाच असते असे म्हणणे म्हणजे उगाचच डोक्यावर प्रौढपणाचे ओझे घेतल्यासारखे आहे. अनेक महिलाही श्रावणात झाडाला झोके बांधून त्यावरून झुलण्याचा आनंद घेत असतात. अर्थात जास्तीत जास्त १० ते २० ङ्गुटांचा हा झोका असू शकतो.

जत्रेमधील झोका किंवा पाळणे साधारणत: ५० ते १०० ङ्गुटांचे असतात. मात्र एक असा झोका अमेरिकेत आहे ज्याची उंची ऐकून तुम्हाला घाम ङ्गुटेल! तब्बल १३०० ङ्गूट एवढी या झोक्याची उंची आहे. हा जगातील सर्वात उंच झोका मानला जातो.

अमेरिकेच्या कोलेरॅडो प्रांतातील ग्लेनवू स्प्रिंगमधील ऍडव्हेंचर पार्कात हा झोका आहे. तसे अनेक झोके या पार्कमध्ये आहेत. पण येथील सर्वात प्रसिद्ध असा झोका आहे, ज्याची उंची तब्बल १३०० ङ्गूट आहे. एका डोंगरावर असलेला जगातील हा सर्वात उंच झोका दूरवरून नजरेस पडतो.

हवा आणि वायूच्या दबावामुळे ताशी ८० किलोमीटरच्या गतीने हा झोका चालतो. त्याच्या आवर्तनातून ११५ अंशाचा कोन तयार होतो. या झोक्यावर एकावेळी अनेक लोक झुलण्याची मजा घेऊ शकतात.

या पार्कच्या मालकाचे नाव स्टीव बेकले असे आहे. ते म्हणतात की, ज्यावेळी तुम्ही या १३०० ङ्गूट झोक्यावर झुलत असता तेव्हा खाली १ ङ्गुटावरचा नजारा पाहून साहजिकच कुणाचेही डोळे ङ्गिरू शकतात!

LEAVE A REPLY

*