नाविन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा – प्रा.जगताप

0
जळगाव | प्रतिनिधी :  देशातील, समाजातील अवती-भवतीचे प्रश्‍न समजून घेत नाविन्यपूर्ण संशोधन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन भाभा अणूसंसाधन केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा.बी.एन.जगताप यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रा.बी.एन.जगताप, प्रा.पी.के.इंगळे, डॉ.अजय प्रकाश, प्रा.डी.जी.हुंडीवाले उपस्थित होते.

पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की, २१ व्या शतकात शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या व्याख्या बदलल्या आहेत. समाजासाठी अवती-भवतीचे प्रश्न घेवून संशोधन करा, परदेशातील संशोधनाचे अणुकरण करु नका. विज्ञान हे आपल्या भोवताली आहे ते समजून घ्या.

प्रा.इंगळे म्हणाले की, या कार्यशाळेचा संशोधक घडविण्यासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. डॉ.अजय प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्यासाठी शिकू नका तर नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी शिका, अभ्यासाचा आनंद घ्या असा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पाटील यांनी समाजाला उपयुक्त संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैभव पाटील, कविता बडगुजर, भारती हिंदुजा, ऐश्‍वर्या निकम, विजय वंजारी, निलम, पूजा चावला, गायत्री सिंधी, हर्षदा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ.रत्नमाला बेंद्रे यांनी केले. प्रा.एस.टी.बेंद्रे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*