दुष्काळातही जगविल्या शेतकर्‍यांनी फळबागा

0
यदुवीर पाटील
वावडे | ता.अमळनेर : येथील व तालुक्यातील शेतकरी हा पूर्ण अवर्षणप्रवण भागातील असून गेल्या चार वर्षांपासून पाऊस कमी असल्याने बागायत क्षेत्र व बागायत करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

शासनाने शेतकर्‍यांना फळबागा लागवड करण्यासाठी योजना असली तरी विहीरीतच पाणी नसल्याने ङ्गळबाग शेतात ङ्गुलणार तरी कशी? पाण्यावाचून शेती करणे शक्यच नाही. परंतु आधुनिक पध्दतीने शेतात पाणी अडवून त्याचा वापर दुष्काळी स्थितीत करून शेतातील ङ्गळबागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न येथील शेतकर्‍यांनी केला आहे.

 

आधुनिक पध्दतीने मल्चींग कागद टाकून शेततळी उभारून ङ्गळबागा उन्हातही जीवंत ठेवण्याचा प्रयत्न या भागातील काही शेतकर्‍यांनी केले आहेत. आणि ते यशस्वी सुध्दा होत आहेत. शेततळ्यात मल्चींग कागद टाकल्याने पाणी साठविण्यासाठी चांगला ङ्गायदा शेतकर्‍यांना होत असल्याचे दिसत आहे.

अगदी खडकाळ भागातील शेतकर्‍यांच्या जमिनीलाही त्याचा ङ्गायदा होत असतांना दिसत आहे.
पावसाळ्यात पडणारे पाणी साठवून त्याचा ङ्गायदा मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत होत असतो. परंतु शेतकर्‍यांसाठी लागणारा मल्चींगचा कागद हा ५०० मायक्रॉनचा असल्यनो त्याची किंमत बाजारात ८० ते ९५रूपये स्क्वेरङ्गुट आहे.

त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांना शेततळे उभारण्याचे अवाक्याबाहेर पडत आहे. यासाठी मोठा खर्च येत असल्याने मल्चींग कागद टाकण्यापासून अनेक शेतकरी वंचीत राहत आहेत.

त्यासाठी शासनाकडून शेततळे सोबत मल्चींग कागदासाठी ५० टक्के अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे दुष्काळातही अधिक ङ्गळबागा ङ्गुलणार असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*