पहिल्याच पावसात ‘अरुणावती’ झाली जलमय

0
अमळनेर, | प्रतिनिधी :  अमळनेर मतदारसंघ सुजलाम सुङ्गलाम होऊन पाणी प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी हिरा उद्योग समूहाने वर्षभर राबविलेला नाला खोलीकरण उपक्रम यशस्वी ठरताना दिसत आहे.

खवशी येथे हा उपक्रम राबविल्याने यंदा झालेल्या पाहिल्याचं पावसात अरुणावती तुडुंब भरली आहे. यामुळे खवशी परिसरातून दुष्काळ हद्दपार होऊन शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे

शेतीला पाणी आणि हाताला काम हि संकल्पना घेऊन अमळनेर मातृ भूमीत पाय रोवणारे आ शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू डॉ रवींद्र चौधरी यांनी अमळनेर तालुक्याचा आढावा घेतल्या नंतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व या नुसार गावागावात नाला खोली खोलीकरण उपक्रम हाती घेतला.

यासाठी डॉ. रवींद्र चौधरी यांनी हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातुन लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला, बघता-बघता अनेक गावात नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले.

यामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात जळगाव जिल्हा नंबर वन ठरला ,मागील वर्षी झालेल्या नालाखोलीकरणामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटून शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यंदा देखील वर्षभरापासून अनेक ठिकाणी या उपक्रमांतर्गत खोलीकरणाचे काम सुरु होते.

खवशी परिसरात सतत दुष्काळाचे सावट राहत असल्याने हिरा उद्योग समूहाने अरुणावती खोलीकरणाचे काम हाती घेतले होते.

अखेर उत्कृष्ट काम झाल्याने यंदा झालेल्या पहिल्याच पावसात हि तुडुंब भरलेली आहे, यामुळे परिसरातील ग्रामस्थ हे चित्र पाहून सुखावले असून आ. शिरीष चौधरी व डॉ. रवींद्र चौधरी यांचे कौतुक होत आहे.

कामाची पाहणी नुकतीच आ शिरीष चौधरी यांनी केले यावेळी किरण गोसावी, राजेंद्र पाटील, डॉ पंकज चौधरी, जयवंत पाटील, योगेश पाटील, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*