सत्यनारायणाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

0
चिंचोली, ता.यावल | वार्ताहर :  आडगाव येथे नवविवाहित तरूणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. मृताचे नाव कैलास सुभाष पाटील (वय २४) असे आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आडगाव (ता. यावल) येथील कैलास सुभाष पाटील या तरूणाचे शनिवारी नागपूर जवळील गोंडेगाव येथे विवाह झाला होता व तेथुन वर्‍हाडी मंडळी रविवारी पहाटे ५ वाजेला आडगाव येथे पोहचली तर येथे सकाळी हळद फेडणीचा कार्यक्रम पार पडला व सत्यनाराणाची तयारी घरी सुरू होती.

सकाळी ८ वाजेला कैलास हा घरातुन बाहेर पडला, तो परतलाचं नाही शोध घेतला असता त्याच्याच शेतविहिरीत त्याचा मृतदेह तेथे आढळला.

याप्रकरणी गणेश अरूण पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन त्याने आत्महत्या का केली असावी? हे मात्र स्पष्ट झाले नाहीये

घटना स्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी, विकास सोनवणे यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामिण रूग्णालयात आणला पुढील तपास सहाय्यक ङ्गौजदार रविंद्र साळी करीत आहेत.

यावल ग्रामिण रूग्णालयात डॉ. ङ्गिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले व रात्री शोकाकूल वातावरणात कैलासवर आडगावात अंत्यविधी करण्यात आला.

LEAVE A REPLY

*