वरुणराजाच्या साक्षीने मुक बधिर मंगल-योगेशचा थाटात विवाह : जिल्हाधिकार्‍यांनी केले कन्यादान

0
जळगाव |  प्रतिनिधी :  विवाह सोहळयाची धामधुम…सनईचा मंगल सूर… प्रसन्न अन् चैतन्यमय वातावरण…उपस्थितांची मांदियाळी यांच्यासह वरुणराजांच्याही साक्षीने शिर्डी येथील साईबाबा मंदिरात सापडलेली आणि स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद मुकबधीर बालगृह, वझ्झर, जि.अमरावती येथे १०० भावंडात लहानाची मोठी होवून उपवधू झालेली दिव्यांग चि.सौ.का. मंगल आणि जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील दिव्यांग चि.योगेश यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

या विवाह सोहळयाने जळगावकरांनी मंगल विवाहाचा राष्ट्रीय महोत्सव आज अनुभवला.

अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांची १९ वी मानसकन्या चि.सौ.का. मंगल आणि रावेर येथील देविदास जैन यांचे सुपुत्र चि. योगेश यांचा शुभविवाह हजारो जळगावकरांच्या उपस्थितीत खान्देश सेंट्रल मॉल येथे मोठ्या थाटात पार पडला.

या विवाहसोहळ्याला सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा.आनंदराव अडसुर, खा. रक्षा खडसे, रोटरी इंटरनॅशनलचे प्रांतपाल महेश मोकलकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. उज्वला पाटील, आ. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, आ. स्मिता वाघ, माजी आ. सुरेशदादा जैन, महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचे संचालक, ज्ञानेश्‍वर राजुरकर, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, बुलढाणा अर्बन को-ऑप बँकचे चेअरमन राधेश्याम चांडक, महापौर नितीन लढ्ढा, जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, रतनलाल सी बाफना, उपमहापौर ललीत कोल्हे, राष्ट्रीय कीर्तनकार सतपाल महाराज, संत कंवरराम बाबांचे वंशज संत राजेश, पं. नंदकुमार सैतवाल महाराज, मंगल विवाह सोहळ्याचे प्रकल्प प्रमुख तथा रोटरी क्लब वेस्टचे सहप्रांतपाल डॉ.राजेश पाटील यांच्यासह हजारो जळगावकरांची उपस्थित होती.

सुरवातीला दिव्यांग गंधारी हिने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दिव्यांग बांधवांसाठीचा कायदा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संागितले.

त्यानंतर पं.नंदकुमार सैतवाल महाराज यांनी मंगलअष्टक म्हटल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात, पोलिस बँडच्या गजरात चि.सौ.का. मंगल आणि चि. योगेश विवाहबंधनात बांधले गेले.

LEAVE A REPLY

*