गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल विभागाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : विजेची बचत, व्यवस्थापन सहज शक्य

0
जळगाव | प्रतिनिधी : विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन बदलत्या परीस्थीतीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातुन आता विजेचे व्यवस्थापन करणे सहज शक्य होणार आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गरजेनुसार विजेचा वापर करणार्‍या प्रकल्पाचे संशोधन केले आहे.

गोदावरी अभियांत्रिकीमधील ईलेक्ट्रीकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी जीएसएम आणि आरदुनो सर्कीटच्या सहाय्याने औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेदरम्यान निरीक्षण व नियंत्रण करणे हा प्रकल्प विकसित केला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादन प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या विभागामध्ये विजेची कमी जास्त गरज असते. या उपकरणामुळे गरज असेल तेवढाच विजेचा पुरवठा करता येणार आहे.

यामुळे विजेची बचत होण्यास देखील मदत होणार आहे. त्याचप्रमाणे स्वयंचलित व नियंत्रण करणेदेखिल शक्य होणार आहे. या प्रकल्पात मायक्रो कंट्रोलर वापरून विजेचे व्होल्टेज व करंट हे घटक चांगल्याप्रकारे ऑपरेटरला समजु शकतात.

या प्रकल्पाची संकल्पना सुप्रिम इंडस्ट्रीचे व्ही.एस.पाटील व अभियंता हेमंत सोनवणे यांनी मांडली. प्रकल्प निर्मीतीसाठी गोदावरी अभियांत्रिकीच्या ईलेक्ट्रीकल विभागाच्या अंतीम वर्षाचे विद्यार्थी अनिरूध्द इंगळे, रोहीत चौधरी, स्वाती पाथरवट, माधुरी महाजन, ईश्‍वर पाटील यांनी परीश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना प्रा. अतुल बर्‍हाटे, प्रा. महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधक विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*