हवामान बदलामुळे भाज्यांची दरवाढ, सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत

0
धानोरा | प्रतिनिधी : हिवाळ्यात लागवड करण्यात आलेल्या भाज्यांची आवक उन्हाळा सुरू होईपर्यंत मोठय़ा प्रमाणात सुरू होती. त्या भाज्या २५ ते ३० टक्के महाग झाल्या आहेत.याला कारणीभूत हवामान आहे.त्यातच वाढलेली उष्णता,काश्मीरमधील पावसाचा परिणाम; शेतकऱ्यांचा संपामुळे आवक घट आहे.

गेल्या काही दिवसांत वाढलेली उष्णता, काश्मीर खोऱ्यात पडलेला पाऊस आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुकारलेला सोमवारचा बंद यामुळे सध्या घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे.

दर अचानक गगनाला भिडले आहेत. काश्मीर खोऱ्यात झालेला अवकाळी पाऊस उत्तर भारतातून येणाऱ्या वाटाण्याला मारक ठरला आहे.त्यामुळे सर्व भाज्या २५ ते ३० टक्के महाग झाल्या आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे घाऊक बाजारातील आवक घटणार असून परिणामी भाज्यांची दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

हिवाळ्यात लागवड करण्यात आलेल्या भाज्यांची आवक उन्हाळा सुरू होईपर्यंत मोठय़ा प्रमाणात सुरू होती.त्यामुळे मार्चअखेपर्यंत भाज्यांचे दर आटोक्यात होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात वाढलेल्या तापमानामुळे मळ्यातील भाज्या करपल्या आहेत. काही ठिकाणी उष्णतेमुळे भाज्यांना कीड लागल्याने आवक घटली आहे.

दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमाचलमधील शिमला सलोन भागातून येणाऱ्या वाटाण्याचीही आवक बंद झाली आहे.

नैसर्गिक आपत्तीबरोबरच कर्जमाफीवरून पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी सोमवारी भाज्या बाजारात पाठविल्या नाहीत. त्यामुळे कमीत कमी ४० ट्रक भाज्या बाजारात कमी आल्या आहेत.

उष्णता वाढल्यानंतर हळूहळू सर्वच भाज्यांचा तुटवडा जाणवणार असून येत्या काळात भाज्यांची दरवाढ अटळ आहे.

घाऊक बाजारात सोमवारी कोबी ४० ते १०० रुपये प्रती किलोने विकला जात होती तर प्लॉवरने १२० ते १४० रुपये दर गाठला होता. हिच स्थिती गवार, कारली, टोमॅटो, दोडका, भेंडी, वाटाणा या भाज्यांची आहे.

LEAVE A REPLY

*