शेतीला उद्योगांशी जोडा- मुख्यमंत्री : मिनीटमेड पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण

0
मुंबई येथील मेक इन इंडियातर्ंगत उत्पादित मिनीटमेड पल्पी मोसंबी ज्यूसाचे अनावरण करताना मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन व इतर मान्यवर.
मुंबई, |  विशेष प्रतिनिधी :  शेतकर्‍यांच्या कर्जमाङ्गीबरोबरच तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही,यासाठी राज्य शासन प्रक्रिया उद्योगाला चालना देणार आहे.

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी शेतीला उद्योगांशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

कोकाकोलाच्या मिनीटमेड  पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले.

यावेळी मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, कोकाकोलाचे भारत आणि दक्षिण पश्चिम आशिया विभागाचे अध्यक्ष टी. कृष्णकुमार, जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, बीईसी ङ्गूडचे व्यवस्थापकीय संचालक विनू जैन, ङ्ग्रुट सर्क्युलर इकॉनॉमीचे भारतातील उपाध्यक्ष असीम पारेख, कोकाकोलाचे इश्तियाक अहमद, अर्पण बासू,वासन शुक्ल आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास जळगाव,औरंगाबाद, जालना तसेच विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या ङ्गळांना उचित मूल्य मिळावे,यासाठी मेक इन इंडिया दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व कोकाकाला सोबत करार केला होता.

आज मोसंबी ज्यूसचे अनावरण त्याचेच ङ्गलित आहे. ङ्गलोत्पादक शेतकर्‍यांना योग्य भाव व बाजारमूल्य मिळणे हे परिस्थितीवर आधारभूत असते. बेभरवशाच्या बाजारापासून सुटका हवी असेल तर शेती मालावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यातून ङ्गलोत्पादनाला शाश्वत बाजारभाव मिळेल. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

मोर्शी येथे १२ विविध ङ्गळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच उत्तम ङ्गळे यावीत, यासाठी दर्जेदार रोपटी शेतकर्‍यांना पुरविण्यासाठी नर्सरीही उभारण्यात येत आहे. यासाठी जैन इरिगेशन व कोकाकोलाचे सहकार्य मिळत आहे.

मोसंबी ज्यूस सोबतच कोकाकोलाच्या ङ्गॅन्टा या शीतपेयामध्ये सध्या ५ टक्के संत्र्याचे ज्यूस मिसळण्याचा आणि हे प्रमाण पुढील काळात १० टक्के करण्याचा निर्णय शेतकर्‍यांसाठी ङ्गायदेशीर आहे. २० हजार टन ङ्गळांवर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पात क्षमता आहे.

तसेच ज्यूसची निर्यातही सोपी झाली आहे. जालना, अमरावती, सोलापूर यासारख्या ङ्गळ उत्पादक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना याचा ङ्गायदा होणार आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कोकाकोलाचे भारतातील प्रमुख कृष्णकांत म्हणाले, की ङ्गळांवर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच कोकाकोलाने ङ्गॅन्टा या आपल्या लोकप्रिय ब्रँडमध्ये सध्या ५टक्के संत्र्याचा ज्यूस मिसळण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील दोन महिन्यात हे प्रमाण १० टक्के होणार आहे. तसेच पुढील पाच वर्षात ङ्गळांच्या ज्यूस तयार करण्याचे प्रमाण वाढविणार आहे.श्री. जैन म्हणाले की, शेतकर्‍यांना दर्जेदार ङ्गळे उत्पादन करता यावीत, यासाठी जैन इरिगेशनतर्ङ्गे उच्च तंत्रज्ञान विकसित करून रोपे तयार करण्यात येत आहे.

ही रोपे तयार करण्यासाठी मोर्शी येथे नर्सरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील रोपे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्‍यांना देण्यात येणार आहेत.

आज अनावरण झालेल्या मोसंबी ज्यूसची निर्मिती ही विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील शेतकर्‍यांनी पिकविलेल्या मोसंबीपासून तयार करण्यात आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत कोकाकोलाने केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत हे उत्पादन तयार करण्यात आहे,असे श्री. अहमद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*