हंबर्डीचा जिर्ण जलकुंभ कोसळण्याची भीती

0
हिंगोणा ता.यावल | वार्ताहर :  येथील गेल्या अनेक वार्षापासून जिर्ण अवस्थेत असेलेला रिकामा जलकुंभ पूर्णपणे जिर्ण झाला असून केव्हाही पडण्याच्या स्थितीत आहे.

टाकीच्या बांधकामातील आसार्‍या उघड्या पडत आहेत. या जलकुंभाशेजारी पोस्ट, ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच गुरांच्या पिण्याच्या हौद याच परिसरात असल्यान तेथ नेहमीच नागरिकांची वर्दळ असते.

त्यामुळे एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडून मोठी जिवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पाण्याच्या टाकीचे अधून मधून सिमेंटचे भाग खाली पडत असल्याने एखाद्या वेळेस टाकीचा मोठा भाग कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे.

संभावित हानी टाळण्यासाठी ग्रा.पं.ने जीर्ण झालेला जलकुंभ योग्य पद्धतीने पाडण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत असल्याने. होण्यार्‍या दुर्घटनेस जबाबदार कोन?असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*