अपघात नियंत्रण, सायबर, महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करणार – कराळे

0
जळगाव | प्रतिनिधी : जिल्ह्यात सायबर क्राईम, महिलांविषयीचे गुन्हे व अपघात नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग, विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल आदी उपस्थित होते.

पोलिस अधिक्षक बोलतांना पुढे म्हणाले की, जिल्हयात अपघाताचे प्रमाण अधिक असून २० ते ४० वयोगटातील मयतांची संख्या अधिक आहे.

त्यामुळे अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अपघात स्पॉटचे सर्व्हेक्षण करणार असून येत्या काही दिवसांत शाळा व महाविद्यालयात अपघात नियंत्रणासाठी मुंबई येथील विनय मेटे यांचे वाहतुकीचा दहशतवाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

तसेच दिवसेंदिवस वाढणार्‍या सायबर क्राईमच्या घटना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगार मेळावा घेणार

पोलिस पाल्यांसाठी येत्या काही दिवसात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यांना नोकरी विषयम मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*