लाच घेतांना दोघे पोलीस गजाआड

0
 
जळगाव / अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनचालक तक्रादाराकडून लाच घेणार्‍या व लाच मागणार्‍या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांवर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने कारवाई केली आहे.
लाच घेणार्‍या नाशिराबाद येलि पोलिस कर्मचार्‍याला 200 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
भुसावळ-जळगाव अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनचालक तक्रारदारांकडून नाशिराबाद पोलिस स्टेशनमधील वाहतुक नियंत्रण कर्मचारी चंद्रकांत विक्रम पाटील वय 36 रा पिंप्राळा याने दि.26 मे रोजी 200 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तसेच जळगाव-भुसावळ वाहतुक करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे लक्ष्मण बाबुलाल पाटील वय 47 रा. शाहुनगर याने वाहतुक करणार्‍या वाहनचालकाकडून 5 हजार रुपयांच्या लाचेची दि.29 रोजी मागणी केली होती.
या दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांची वाहनचालकांने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीची पडताळणी करून अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने सापकळा रचून नाशिराबाद पोलिस स्टेशनचे पोलिस पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील वय 36 याला तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.
तसेच शहर वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी लक्ष्मण पाटील यांनी तक्रारदाराक डून 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे सिध्द झाल्यानंतर आज त्यांच्या शाहुनगर येथील निवासस्थानावरून त्यांना अटक करण्यात आली.

असा रचला सापळा
तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाला तक्रार दिल्याने आज दुपारी अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे कर्मचारी व अधिकारी तक्रारदाराच्या वाहनाने प्रवासी म्हणून जळगावकडून भुसावळकडे जाण्यास निघाले. यावेळी महामार्गवर वाहन अडविल्यानंतर तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच घेतांना चंद्रकांत पाटील यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

*