शेतकरी पेटलाय,असाच कायम राहा – राज ठाकरे

0
मुंबई / शेतकर्‍यांचा राग हा असाच कायम राहिला पाहिजे. तरच हे सरकार वठणीवर येईल असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केलाय. तसंच अण्णा हजारे मध्यस्थी करून आंदोलनावर तोडगा काढत असली तर मध्यस्थी करावी असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
शेतकरी संपावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला. मनसे नेहमती शेतकर्‍यांच्या पाठिशी आहे.
यात दुमत नाही. पण शेतकर्‍यांना या संपातून काय मिळणार आहे ? गोडाऊन मिळणार आहे का ?, त्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहे का ?, जर हे होणार नसले तर शेतकर्‍यांचा उद्रेक असाच सुरू राहिला पाहिजे.
शेतकर्‍यांचा राग कायम राहिला पाहिजे तरच याला अर्थ राहिल असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
…तर अण्णांनी मध्यस्थी करावी
शेतकर्‍यांच्या प्रश्न सुटला पाहिजे आहे. अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील तर त्यांनी करावी. विंचू कुणाच्या चपलेनं मेला हा प्रश्न नाही तर विंचू मेला पाहिजे हा प्रश्न आहे त्यामुळे अण्णांनी मध्यस्थी करावी अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.
भाजपकडे घोषणांना नावं देणारी समिती
भाजप सरकारने आजपर्यंत अनेक घोषणा दिल्यात. अनेक आवाहनं दिली. मुख्यमंत्री फक्त बिल्कुल करू एवढंच आश्वासन देतात. निवडणुकीच्या आधी घोषणा दिल्या त्यानंतर सत्तेवर आल्यावरही घोषणा दिल्या. या घोषणा पूर्ण करण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे का ? घोषणांना गोंडस नावं देण्यासाठी यांच्याकडे समिती आहे. अशी टीका ही राज ठाकरेंनी केली.
सेनेचे मंत्री फक्त अंडी देण्यासाठी
सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कुठे आहे हेच कळत नाही. या मंत्र्यांना अंडी उगवण्यासाठी खाती दिलीये. मंत्रालयात रोज नवीन अंडी देतात. त्यापलीकडे त्यांच्याकडे कोणतेही काही काम नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

LEAVE A REPLY

*