शरद पवारांनीच राष्ट्रपती व्हावे – प्रतिभा पाटील

0
पुणे / सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांनी जरी या शक्यतेस नाकारले असले तरी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही शरद पवार यांना राष्ट्रपती होण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवार कृतज्ञता सन्मान समारंभात पाटील यांच्याहस्ते पवारांना सन्मानीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

देशात महिला आरक्षणाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली होती. 1992 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

पुढे देशपातळीवर महिला आरक्षणाला मान्यता मिळाली. आरक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये महिला सबलीकरणाचे धोरण शरद पवार यांनी अंमलात आणले.

महिलांना खर्‍या अर्थाने सन्मान प्राप्त करून देणार्‍या शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील आजी-माजी महिला लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वपक्षीय स्वरुपाचा हा कार्यक्रम होता.

त्यामुळे सर्व स्तरातील महिला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ह्यादेखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*