यूपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

0
जळगाव / यूपीएससी परीक्षेच्या अंतिम निकालात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांनीदेखील या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1099 पदांसाठी जाहीर झालेल्या निकालात सौरभ सोनवणे, कुलदीप सोनवणे व सदानंद कलसू, मनोज महाजन यांच्यासह अन्य विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.

   

सौरभ संजय सोनवणे हा शहरातील रहिवाशी असून 293 च्या रँकने बाजी मारलेली आहे. तसेच कुलदीप सुरेश सोनवणे हा मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवाशी असून 384 व्या रँकने यशस्वी झालेला आहे.

मागील युपीएससी परीक्षेत देखिल तो यशस्वी ठरलेला असून आयपीएस पदी त्याची निवड झालेली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळविलेले यश हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

नांदेड येथील सदानंद रामराव कलसू या विद्यार्थ्यांने 724 व्या रँकने यश मिळविलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे गोपाल दर्जी यांच्यासह ज्योती दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा व दर्जी फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक केले.

अडावदचा मनोज महाजन यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण
अडावद येथील मनोज सत्यवान महाजन हा यूपीएससी परीक्षेत 903 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. मनोज महाजन अडावद येथील कै. शामराव धना महाजन यांचा नातू असून पाचोरा तालुक्यातील गाळण आश्रम शाळेचे पर्यवेक्षक सत्यवान शामराव महाजन यांचा मुलगा आहे.

मनोज ने बिटेक पर्यंतचे शिक्षण घेऊन यूपीएससी च्या तयारी केली दिल्ली येथे राहून संपूर्ण परीक्षेची तयारी केली होती. तसेच मनोजने नेट परीक्षेत इतिहास विषयात 350 पैकी 218 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले .

मनोज र्क्षीपळेी ठशीशरीलह ऋशश्रश्रेुीहळि व ीीळीींरपीं झीेषशीीेी या पदासाठी पात्र ठरला आहे. मनोज हा अडावदमधून पहिला यूपीएससी चा मानकरी ठरला आहे.

एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील क्लास वन पोस्टच्या दोन परीक्षेत यश संपादन करण्याचा बहुमान मनोज महाजनला मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*