शेतकरी आजपासून संपावर

0
जळगाव / शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा, वीजबिल माफ करावे, खतांवरील अनुदान वाढवावे, शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, शेतकर्‍यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा आदी मागण्यांसाठी उद्या दि. 1 जूनपासून जिल्ह्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार आहेत.
या संपात जिल्हाभरातील चार लाख शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा किसान क्रांती कृती समितीने केला आहे.
शेती मालाचा उत्पादन करण्याचा खर्च वाढला परंतू तेवढे माला भाव देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांवर अवाजवी विज बिल दिले जात आहे.
खत-कीटकनाशक औषध कंपन्या वाजवी भाव घेवून शेतकर्‍यांना लुटत आहे. तसेच सरकारच्या फसव्या पत धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे, आयात निर्यात धोरणामुळे शेतमालाचे भाव पडत असून शेतकर्‍यांना न्याय मिळावा तसेच शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करावे, सर्व विज बिल माफ करून कमी दरात विज पुरवठा करावा, ठिबंकावर अनुदान, दुधाला 50 रुपये भाव द्यावा, खत- किटनाशकांच्या भावावर नियंत्रण ठेवावे, पिक विमा योजना लागू करावे, शेतमालाच्या भावासाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा. यासाठी शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी संपात सहभागी होण्याची तयारी पुर्ण झाली असुन सर्व तालुक्यामध्ये संपाबाबत निवेदन देण्यात आले आहे.

दि 1 जून पासून संप पुकारून शेतकर्‍यांनी घरापुरतेच धान्य पिकवणार आहे, बाजारात आपला शेतमाल विकणार नाही, माल शहरात न आणता गावातच विकणार आहे, तसेच तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिले जाणार असुन संपात सहभागी होण्याचे आवाहन एस.बी.पाटील, जगतराव पाटील, मराठा विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डी.डी.बच्छाव, कडूअप्पा पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*