अच्छे दिनची घोषणा मृगजळासारखी

0
जळगाव / केंद्रातील मोदी सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. मोदी सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ असुन ‘अच्छे दिन’ची घोषणा ही मृगजळासारखी ठरल्याची टिका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत केली.
मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाबाबत जिल्हा काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परीषदेत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील पुढे म्हणाले की, 26 मे 2014 मध्ये मोदींनी सत्तेचा पदभार घेतला.
आम्ही देखिल त्यांना काम करण्यासाठी कालावधी दिला. परंतु आता तीन वर्ष उलटुन गेले आहेत. या तीन वर्षात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टिका त्यांनी केली.

मोदी सरकारने भुमिपुजन केलेल्या इंदु मिलच्या स्मारकाची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कार्यकाळात झाली.

मोदी सरकारने 2 कोटी रोजगाराची घोषणा केली होती. मात्र अद्यापही सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम नाही. काश्मिर खोर्‍यात आतंकवाद्यांकडुन जवान मारले जात असुनही हे सरकार बघ्याची भुमिका घेत आहे.

वर्षभरात तीन लाख महिलांवर अत्याचार झाले असुन महिलाही सुरक्षित राहील्या नाही. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आम्ही लावुन धरला असुन सरकार याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस पक्षातर्फे 2019 च्या निवडणुकीसाठी दोन वर्षाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. संदीप पाटील यांनी दिली.

मग कारखान्यांना कर्ज का ? – उदय पाटील
जिल्हा बँकेकडे शेतकर्‍याला कर्ज देण्यासाठी पैसा नाही. मग संत मुक्ताई कारखान्याला 51 कोटीचे कर्ज कसे काय दिले ? असा सवाल माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी उपस्थित केला.

संविधानाची मानहानी- डॉ. राधेशाम चौधरी
मोदी सरकारने तीन वर्षात लोकशाही मुल्यांना कमजोर केले आहे. तसेच संविधानाची मानहानीही केल्याचा आरोप शहर कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी केला.

LEAVE A REPLY

*