विठ्ठल नामाच्या गजरात शेगावचे गजानन महाराज निघाले विठ्ठल भेटीला

0

दिपक सुरोसे | शेगाव :

‘संपदा सोहळा नावडे मनाला
लागला लळा पंढरीचा ॥
जावे पंढरीसी आवडे मनाशी
कधी एकादशी आषाढी हे ॥
विठ्ठलाच्या नामस्मरणात शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरकडे रवाना झाली.
आज सकाळी सात वाजता श्री संत गजानन महाराज संस्थानामधुन पालखी निघाली.

पालखीचे विधीवत पूजन संस्थानचे व्यवस्थापक शिवशंकर भाऊ पाटील यांनी केले.

यावेळी विश्‍वस्त डॉ. रमेशचंद्र डांगरा, नारायण पाटील, किशोर टाक, निळकंट पाटील व भाविक उपस्थित होते.

सुमारे ६५० वारकर्‍यांसोबत ही पालखी पंढपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

LEAVE A REPLY

*