देह जावो अथवा राहो! पांडूरंगी दृढ भावो! : मुक्ताई निघाली पंढरीला!

0

मुक्ताईनगर, |  वार्ताहर :  श्री संत मुक्ताई संस्थान कोथळी -मुक्ताईनगर समाधीस्थळ जि. जळगाव येथून आषाढी वारीसाठी हजारो वारकर्‍यांचे मेळ्यासह मुक्ताई पालखी सोहळाने आज प्रस्थान ठेवले.

संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रथम प्रस्थान ठेवणारी संत मुक्ताई समाधी स्थळारून भुवैकूंठ पंढरीला आषाढी वारीसाठी जाणार्‍या मुक्ताई पालखी ने आज हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मुक्ताई -मुक्ताई नाम जयघोषात प्रस्थान केले.

तत्पूर्वी सात दिवसापासून प्रस्थान सोहळ्यानिमीत्य चंद्रकात महाराज साकरीकर यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकिर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली.

राजु प्रकाश पाटील यांचे पालखी रथाचे मानाचे बैल नाचणखेडे येथून विधीवत पुजन करून मिरवणुकने कालच पोहचले.
आज पहाटे मंगल काकडारतीने आई मुक्ताईस महापुजा श्री पुंडलीकराव दामोधरराव पवार चापोरकर यांचे हस्ते करण्यांत आली.

संस्थान चे मानकरी व अध्यक्ष ऍड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील व यांचे हस्ते पुजारी विनायक व्यवहारे यांनी पादूकाना पंचामृत अभिषेकाने सुरूवात करताच वारकरी दिंडीनी प्रस्थान भजन सुरू केले.

मुक्ताई जयघोषात देहभान हरपत तल्लीन झाले होते सकाळी ११ वाजता मुक्ताईनगरी चे नुतन तहसीलदार रचना पवार, जळगाव जि.प .उपाध्यक्ष नंदू महाजन, पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांचे हस्ते पादूका पालखीत स्थानापन्न करून आरती झाली.

देह जावो अथवा राहो!
पांडूरंगी दृढ भावो!!
चरण न सोडी सर्वथा!
आण तुझी पंढरीनाथा!!
वदनी तुझे मंगळ नाम!
ह्रदयी अखंडीत प्रेम!!
नामा म्हणे केशवराजा!
केला नेम चालवी माझा!!

…हा अभंग म्हणून मंदीराला प्रदक्षिणा करून पालखी रथात ठेवून प्रस्थान झाले. मुक्ताईनगर व कोथळी ग्रामस्थांनी जड अंतःकरणांनाने आई मुक्ताई ला निरोप दिला. यावेळी संस्थानचे विश्वस्त व कार्यकारी मंडळ चे सदस्य पांडूरंग पाटील पंजाबराव पाटील, अशोकराव पवार, संदीप पाटील, पाटील, विनायकराव हरणे, जिल्हा बँक अध्यक्ष रोहीणी खेवलकर , बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प. सदस्य आत्माराम कोळी पं.स. सदस्य भारती भोई, झेंडूजी महाराज ङ्गडाचे रमाकांत भारंबे, दत्तु पाटील, बारसु खडसे, सखाराम महाराज, दिंडीचे विश्वभर महाराज तिजारे ,प्रल्हाद महाराज सुळेकर, विनोद सोनवणे, पुंडलीकराव पवार, डिगंबर महाराज मठाचे नरेंद्र नारखेडे, वारकरी संघटक शेखर वानखेडे उपस्थित होते.

जुने गावात पालखी आलेनंतर नागेश्वर मंदिर येथे महाजन परिवाराचे वतिने स्वागत करण्यांत व भाविकांना भोजन देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांसह तर मुक्ताईनगर सरपंच ललित महाजन, वारकरी संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, सदाशिव पाटील, रामरोटी आश्रमाचे नंदकिशोर गांवडे यांनी व ॐ साई सेवा ङ्गाऊंडेशन तर्ङ्गे पालखीचे पुजन केले.

दुपारी ३ वाजता नविन मंदिरात वारकरी विसावा घेवून सातोड मुक्कामी रवाना झाले.पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे महाराज व पुजारी सुधाकर पाटील सेवा देत आहेत.

जळगाव जि.प.तर्ङ्गे डॉ.चव्हाण आपल्या आरोग्य पथक व रूग्णवाहीकेसह दिंडी सोबत सेवेसाठी तत्पर आहेत. उद्या पालखी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करील.

LEAVE A REPLY

*