मुक्ताई साखर कारखान्याला दिलेले कर्ज रद्द करा – शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचे एमडींना निवेदन

0
जळगाव | प्रतिनिधी : जिल्हा बँकेतून शेतकर्‍यांना कॅश स्वरुपात कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यातच जिल्हा बँकेने संत मुक्ताई शुगर ऍण्ड एनर्जी लि. ता. मुक्ताईनगर या साखर कारखान्याला ५१ कोटी रुपयांचे कर्ज मंजुर केले आहे. हे कर्ज रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख यांना दिले आहे.

जिल्हा बँक प्रशासनाने १८ नकारात्मक मुद्दे मांडले असतांना देखील जिल्हा बँकेकडून मुक्ताई शुगर ऍण्उ एनर्जी लिमिटेडला यंत्रसामुग्री आधुनिकीकरण व वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ५१ कोटी २५ लाख रुपये मध्यम मुदतीचे कर्ज मंजुर करण्यात आले आहे.

भाविष्यात कर्ज वसुल न झाल्यास जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा व संत मुक्ताई कारखान्याच्या व्हाईस चेअरमन यांच्या नावाने एकाच व्यक्तीचे हितसंबंध जोपासणारे कर्ज तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी, हभप जळकेकर महाराज, नंदलाल पाटील, ज्ञानेश्‍वर सोनवणे, कुलभुषण पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*