जळगाव जिल्ह्यातील १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
जळगाव |  प्रतिनिधी : जिल्हा पोलीस बदल्यांबाबत काही दिवसांपासुन उत्सुकता लागुन होती. पोलीस कर्मचार्‍यांपाठोपाठ आज पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल १८ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हातर्ंगत बदल्यांचे पत्रक जारी केले.

पारोळा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोनि. भाऊसाहेब पठारे यांची चाळीसगाव ग्रामिण, चाळीसगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनिल गायकवाड यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे, जिल्हापेठ पोलीसांत कार्यरत असलेले एकनाथ पाडळे यांची पारोळायेथे बदली झाली.

तर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अशोक रत्नपारखी यांची नियंत्रण कक्ष, औरंगाबाद शहर येथुन नव्याने बदलुन आलेल्या धनंजय वेरुळे यांची जळगाव शहर पोलीस ठाणे, रामानंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रविण वाडीले यांची शनिपेठ येथे बदली झाली.

तर  ठाणे शहर येथुन बदलुन आलेल्या बापु रोहम यांची रामानंदनगर पोलीसांत, चाळीसागाव पोलीसांत कार्यरत असलेले आदीनाथ बुधवंत यांची आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक येथुन बदलुन आलेले नरेंद्र पिंगळे यांची रावेर पोलीसांत येथे बदली झाली.

तर अहमदनगर येथुन बदलुन आलेले शाम सोमवंशी यांची जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतुक शाखेचे अनिल देशमुख यांची चोपडा ग्रामीण, नाहस येथुन आलेले बाळु सोनवणे यांची सुरक्षा शाखा येथे बदली झाली.

तर  नागपुर येथुन बदलुन आलेले भिमराव नंदुरकर यांची मानव संसाधन विभाग, अकोला येथुन बदलुन आलेले अनिरुध्द आढाव यांची बोदवड पोलीसांत, जिल्हा वाहतुक शाखेचे रामकृष्ण गाढे यांची चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात येथे बदली झाली.

तर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सतीष भामरे यांची शहर वाहतुक शाखेला तर शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोनि. प्रदीप ठाकुर यांची जिल्हा वाहतुक शाखेला बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तत्काळ कार्यभार स्विकारावा असे आदेश पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले.

LEAVE A REPLY

*