संगित संशेव कल्लोळ…प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यात यशस्वी…

0
जळगाव रसिक पे्रक्षक नाटकांसाठी किती आसुसला आहे. याचाच प्रत्यय संगित संशेव कल्लोळ च्या प्रयोगाच्या वेळी आला.
खर तर या नगरीला नाटकाची व नटांची सुद्धा मोठी परंपरा आहे. परंतु प्रयोगाचे सातत्य मात्र अभावानेच जाणवते. खुप प्रयत्न अनेक मातब्बरांनी केलेत परंतु… ते कुठेतरी कमी पडतात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या…. दिपक चांदोरकर डॉ. हेमंत कुलकर्णी आणि राजेंद्र पाटणकर यांनी मात्र एक धाडसी निर्णय घेऊन जळगांव नगरीचे स्वत:चे एक व्यावसायीक नाटक बसवावे आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर करावे व यातील कलावंतांना पुढे त्यांचे करियर ही या नाटकाद्वारे करता यावे… केवळ हा दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन हे नाटक बसवण्यात आले व त्याचा शुभारंभाचा प्रयोग 27 मे शनिवारी गंधे सभागृहात प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला.
नाट्य समीक्षक सुबोध सराफ
या नाटकाचा बाज हा लोककलेचाच होता कथासुत्र देखिल त्याच वळणाने जाणारे म्हणजे थोडक्यात निखळ मनोरंजन करणारे गण, गवळण आणि बतावणी या साच्यात परफेक्ट बसणारे दोन अंक धमाल उडवणारे नाटक या नाटकाचे लेखन डॉ. हेमंत कुळकर्णी यांनी हे नाटक लिहितांना एक खबरदारी घेतली आणि दिग्दर्शन देखील ते स्वत: च असल्याने नाटक कसे सुटसुटीत होईल याचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.

या नाटकाचा प्रयोग करतांना रंगमंच प्रकाश योजना, सेट, नेपथ्य, इ. सर्व प्रकारांना फाटा देऊन कलाकारांना त्यांनी मोकळे मैदानच उपलब्ध करुन दिलेले आहे. व या संधीचा योग्य फायदा या नाटकातील कलावंतांनी पुरेपुर घेतल्याचा दिसले. दिग्दर्शकाने दिलेल्या हलचाली जागा आणि भुमिकेला साजेशा लकबी सर्व कलावंतांनी अगदी मनापासुन घेतलेल्या दिसतात.

याचा उल्लेख पुढे सविस्तर येईलच सुरवातीला या नाटकाची संहिता दिग्दर्शन या संदर्भात उल्लेख करणे महत्वाचे ठरेल. या दोन्ही कामगिरी डॉ. हेमंत कुळकर्णी लिलया पार पाडतात, तरी लोकनाट्याचा बाज म्हणजे त्यांच्या लिखणावर त्या पठडीतील मातब्बरांच्या लेखनाचा धाटणीचा प्रभाव हा प्रकर्षाने दिसतोच आणि अजुन एक महत्वाची बाबींचा उल्लेख करावासा वाटतो की, केवळ नुसत्या एखाद्या संवादाने किंवा काही हलचालींनी नाटक समकालीन नाही होऊ शकत. परंतु त्यांचा अनुभव पणाला लावुन त्यांनी एक सशक्त संहिता तयार केली आहे. अगदी गणेशाच्या आराध्येपासुन, श्रीकृष्ण, पेंघा, मावशी आणि गवळणी यांचे खसखशीत संवाद व नंतर राजा – राणी, प्रधान, शिपाई, शाहीर आणि सगुणा यांच्यातील चढा ओढीचे संवाद तर धमाल आणतात. या संवादातुनच पुढील नाट्य उलगडत जाते व संहिता पुढे सरकते याचा प्रवाह मात्र दिग्दर्शक म्हणुन डॉ. हेमंत कुळकर्णी मोठ्या हिमतीने पुढे नेतांना आढळतात.

सर्व पात्रांच्या हलचाली, लकबी आणि लोकनाट्याच्या ज्या काही विशेष जागा असतात त्या पात्रांकडुन चोख बसवुन घेतल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नास सर्व कलाकारांनी योग्य अशी साथ दिलेली आहे. संहितेचा प्रवास हा राजा, राणी, प्रधान, शिपाई, यांच्यातील महत्वाकांक्षेमुळे, एकमेकांवर संशय घेणे, कुरघोडी करणे, यातुन समाजातील काही त्रुटींवर योग्य रीतीने बोट ठेवत पुढे जातो.

शाहिर आणि सगुणा ही दोघही यात वेगळीच गंमत आणतात, सगुणा शाहिराला सरकारी नोकरीत लागावे म्हणुन हट्ट धरते, राजा सगुणाच्या मोहजालात कालांतराने अडकतो, ती दोघ चमेलीच्या बागेत भेटावे अस शाहिर ठरवतो. व तिथे राणीलाही बोलावतो शिपाई तिथे पुतळा बनुन हजर असतो. व शेवटी प्रधानालाही देखील बुरखा घालुन चमेली बागेत अवतरतो, या सर्व पात्रांची गुंतागुत एकमेकां वरील संशय हा टिकेला पोहोचतो.व योग्य वेळी राजाला पश्चाताप होतो आणि त्याची चुक त्याला कळते व हेचि दान द्यावे तुझा विसर ना व्हावा…. या तुकारामाच्या अभंगाने शेवट होतो.

हे सर्व कथानक वेगाने व सांगितिक साथीने प्रेक्षकांपुढे सादर होत जाते. प्रेक्षकही या धांदली मध्ये गुंतत जातात. पात्रांच्या वेगवान हालचाली, गाणी, गतीमान संहिता ही या नाटकाची बलस्थानं राजा म्हणुन किरण अडकमोल धमाल उडवतात राजाच्या भूमिकेस योग्य अशी बॉडी लँग्वेज संपुर्ण नाटकभर राखण्यात ते यशस्वी ठरतात.

चमेलीच्या बागेतील आ. हा. आजा आ. हा. आजा या प्रसंग ते या जोरावर विशेषत्वाने खुलवतात, प्रधान बनलेले दिनेश माळी यांची कामगिरी उत्तम काही प्रसंगात ते बाजी मारतात पण, त्यांनी शारिरीक हलचाली व वाचिक अभिनयावर थोडा जोर द्यायला हवा,

शिपाई म्हणुन तेजस गायकवाड आणि प्रामुख्याने पुतळा म्हणुन चमेली बागेतील त्यांची कामगिरी उल्लेखनिय नाटकाला वेगवान ठेवण्याचे महत्वाचे काम या गुणी कलावंताने केले आहे.

अपूर्वा कुळकर्णी हिने सुरवातीला कृष्णा सोबत सादर केलेले नृत्य ते नर्तकी, सगुणा यातील छटा योग्य रितीने पेश केल्यात म्हतारी बनुन आलेल्या पात्रातही तिने धमाल उडवली. संपूर्ण रंगमंच वेगवान ठेवण्यात यशस्वी राणी बनलेली आरती गोळीवाले हिने संपूर्ण नाटकावर प्रभाव टाकत आपली कामगिरी चोख बजावली अगदी सुरवाती पासुन गण, गवळण बतावणी पासुन ते राणी व चमेली बागेतील गोंधळ या सर्व प्रसंगामध्ये योग्य ते भूमिकेचे बेअरिंग मोठ्या खुबीने सांभाळले आणि आता राहता राहता शाहिर, विशाल जाधव या कलाकारास वाव खुप होता. अगदी मावशी पासुन शाहिर आणि चमेली बागेतील प्रसंग या सर्व ठिकाणी विशालच्या लकबी खासच परंतु आवाजाच्या चढ उतारावर त्याने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.आणि भूमिके बरहुकुम आवाजातही बदल करणे आवश्यक ठरते हे लक्षात घेणे महत्वाचे ठरेल.

प्रवाही संवाद, रंगमंचावरील वेगवान हलचाली आणि लेखक, दिग्दर्शक म्हणुन डॉ. हेमंत कुळकर्णी यांनी संगित ‘ संशेव कल्लोळ ’ या नाटकाचा प्रयोग उत्तम पार पडला. सुत्रधार दिपक चांदोरकर, राजेंद्र पाटणकर यांची मेहनत व कामगिरी विशेष उल्लेखनिय प्रामुख्याने या नाटकाचे संगित संयोजक दुष्यंत जोशी आणि ज्युईली कलभंडे यांचे विशेष अभिनंदन.

नाटकाच्या तांत्रिक बाजु असतात विशेष करुन महागडे नेपथ्थ, प्रकाश योजना, फुल्ललाईट्स इ. या सर्वांना फाटा देऊन हा प्रयोग कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो आणि तो ही खिळवुन ठेवणारा यामुळे महाराष्ट्र भर या नाटकाचे प्रयोग होतील व या आगळ्या वेगळ्या प्रयोगास प्रेक्षक नक्कीच स्विकारतील या नाटकास व सर्व कलावंतांना खास शुभेच्छा.

LEAVE A REPLY

*