भुसावळला उज्वल निकालाची परंपरा कायम

0
भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने इंटरनेटवर जाहिर केलेल्या ङ्गेब्रुवारी/मार्च २०१७ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत भुसावळसह विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
पु.ओं. नाहाटा महाविद्यालय भुसावळ
 येथील विज्ञान शाखेचा निकाल ९७.५३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८९.७६ टक्के तर कला शाखेचा निकाल ७१.३२ टक्के लागला आहे. महाविद्यालयात  विज्ञान शाखेतून प्रथम अपूर्वा संजय पाटील ८९.६९ टक्के, द्वितीय मोहित संजय ढाके ८८.९२ टक्के, तृतीय राहुल मनोहरलाल सोढाई ८४ टक्के  मिळवून आला आहे.
वाणिज्य शाखेत प्रथम प्रजोत ङ्गुलचंद अग्रवाल ९१.३८ टक्के, द्वितीय प्रतिक कमलाकर बेंडाळे ८८.७७ टक्के व तृतीय उत्कर्षा ललित धांडे ८६.४६ टक्के आले आहेत.
कला  शाखेत प्रथम धनश्री रविंद्र घोडके ७५.५३ टक्के, द्वितीय मनोज रमेश रंदाले ७५.२३ टक्के व तृतीय जयश्री अरूण पाटील ७४टक्के आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मोहन ङ्गालक, चेअरमन महेश ङ्गालक, सचिव विष्णू चौधरी, संचालक संजयकुमार नाहाटा, सर्व संचालक, प्राचार्या डॉ.सौ.एम.व्ही. वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.बी. पाटील,  प्रा.बी.एच. बर्‍हाटे, प्रा.ए.डी. गोस्वामी, प्रा.एन.ई. भंगाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.बी. पाटील, पर्यवेक्षक यु.बी. नंदाने यांच्यासह शिक्षक व कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.
 कोटेचा महिला महाविद्यालय
  येथील कला  शाखेचा एकूण निकाल ७५.५५ टक्के, वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९६.६० टक्के तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९३.१० टक्के लागला आहे. कला शाखेतून स्नेहल सुर्यकांत साखरे हि ७९.८५ टक्के मिळवून प्रथम, वनिता अरूण धांडे ही ७५.६९ टक्के मिळवून द्वितीय तेजस्वीनी निवृत्ती पाटील ही ६९.०७ टक्के मिळवून तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेत काजल सुनिल हेडा ही ९०.९२ टक्के मिळवून प्रथम, ममता सुनिल भालेराव ८८.४० टक्के मिळवून द्वितीय तर समृध्दी विनोद ङ्गालक ही ७८.४६ टक्के मिळवून तृतीय आली आहे.
विज्ञान शाखेतून दिक्षा अमितकुमार पाटील ७७.२३ टक्के मिळवून प्रथम, धनश्री गणेश जोशी ही ७६.३० टक्के मिळवून द्वितीय तर केतकी प्रसाद जोशी ही ७४.९२ टक्के मिळवून तृतीय आली.
सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थाध्यक्षा  श्रीमती पद्माभाभी कोटेचा, सचिव संजय सुराणा, प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, संचालक दिपेश कोटेचा, सर्व संचालक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचार्‍यांनी कौतूक केले आहे.
 के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
 येथील विज्ञान शाखेचा एकूण निकाल १०० टक्के तर कला, वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून करण विलास सोनवणे हा ८८.३१ टक्के मिळवून प्रथम, अम्मार मुस्तङ्गा बत्तीवाला हा ८७.५३ टक्के मिळवून द्वितीय तर भुमिका महेश चोपडे ही ८५.६९ टक्के मिळवून तृतीय आली आहे.
कला शाखेतून  रूपाली राजेंद्र गजरे ही ६०.४६ टक्के मिळवून प्रथम, कोमल दिलीप कांबळे ५७.३८ टक्के मिळवून द्वितीय तर पूजा वसंत तायडे ५५.५४ टक्के मिळवून तृतीय आली आहे.
वाणिज्य शाखेतून वैभव सुनिल पाटील हा ८९.२३टक्के मिळवून प्रथम, श्रुती जयंत नेवे ही ८५.२३ टक्के मिळवून द्वितीय तर भाग्यश्री यशवंत शिरनामे ही ८४.९२ टक्के मिळवून तृतीय आली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून  विज्ञान शाखेतून करण विलास सोनवणे हा ८८.३१ टक्के मिळवून प्रथम, वाणिज्य शाखेतून रोहित सुनिल जमदाडे हा ६६.४६ टक्के मिळवून प्रथम व कला शाखेतून सागर सुरेश जाधव हा ५४.६२ टक्के मिळवून प्रथम आला आहे.
तर मागासवर्गीय मुलींमधून विज्ञान शाखेतून आकांक्षा विजय सपकाळे ही ७३.५४ टक्के मिळवून प्रथम, वाणिज्य शाखेतून निकीता विजय राऊत ही ६७.६९ टक्के मिळवून प्रथम व कला शाखेतून रूपाली राजेंद्र गजरे ही ६०.४६ टक्के मिळवून प्रथम आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष दादासाहेब एन.के.नारखेडे, उपाध्यक्ष श्रीनिवास नारखेडे, चेअरमन पी.व्ही. पाटील, सचिव डॉ.मकरंद नारखेडे, संजीव नारखेडे, किशोर नारखेडे, मिलिंद पाटील, विजय भंगाळे, विकास पाचपांडे, मानद सचिव प्रमोद नेमाडे, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक ए.सी. वारके, उपमुख्याध्यापक एन.बी. किरंगे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.एन. भारंबे, पर्यवेक्षक आर.ई. भोळे, वाय.एन. झोपे, शिक्षकवृंद व कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.
 यावल
 येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील  बारावीचा एकूण निकाल ८३.६४ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९३.५४ टक्के लागला असून देवयानी भगवान सुर्यवंशी ही विद्यार्थीनी प्रथम आली आहे. कला शाखेचा एकूण निकाल ७० टक्के लागला असून कोमल चंद्रकांत साळुंखे ही ७२.७६ टक्के मिळवून प्रथम आली आहे.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ७७.९६ टक्के लागला असून स्नेहा बाळू पाटील ही ६९.८४ टक्के मिळवून प्रथम आली आहे. अकाऊंटींग ऍण्ड ऑडिटींगसाठी ३३ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ८१.८१ टक्के आहे.
मार्केटींग ऍण्ड सेल्समनशिप साठी १८ पैकी१७ विद्यार्थी उर्त्तीण होवून एकूण  निकाल ९४.४४ टक्के लागला आहे. बिल्डींग मेंटनन्स परिक्षेला बसलेल्या ८ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण होवून एकूण निकाल ३७.०५ टक्के लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नरेंद्र भास्कराव पाटील, उपाध्यक्ष  प्रा.डी.डी. बच्छाव, संचालक विजय पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ.एङ्ग. एन. महाजन, उपप्राचार्य, प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.
 बामणोद, ता.यावल
 येथील पीएसएमएस स्कुल व ज्यु.कॉलेजचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९६.७०टक्के तर कला शाखेचा एकूण निकाल ६१.७६ टक्के लागला आहे.
 विज्ञान शाखेतून  ऋतुजा सुरेश भंगाळे ही ५२१ गुण मिळवून प्रथम तर अपेक्षा सुनिल पाटील हीने ५१८ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
कला शाखेतून प्राजक्ता दगडु तायडे हिने ४७२ गुण मिळवून प्रथम, गायत्री रामा नेमाडे हिने ४६३ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, चेअरमन डॉ.जे.डी. भंगाळ, प्राचार्य ए.ए. कोळी, सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.
 बोदवड-
बोदवड शहरातील न.ह. रांका हायस्कुल बारावी कला शाखेचा एकूण निकाल ८३.१२ टक्के, वाणिज्य शाखेचा  ९३.९१ टक्के तर विज्ञान शाखेचा ९१.९० टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान शाखेत सागर शंकर सोनार यास ८१.३८ टक्के प्रथम, दिलीप रविंद्र पाटील यास ७५.८४ टक्के द्वितीय तर वैभव सुनिल घोरपडे यास ७५.५ टक्के गुण मिळवून तृतीय आला.
वाणिज्य शाखेत पुजा भगवान काटे ८०.६१ टक्के प्रथम, पंकज राजू तेली ७७.८४ टक्के द्वितीय तर वैभव गोपाळ पाटील ७७.०७ टक्के मिळवून तृतीय आला आहे.
कला शाखेत किरण रविंद्रसिंग पाटील ८९.५३ टक्के मिळवून प्रथम, गणेश गोपाळ पाटील ७९.०७ टक्के मिळवून द्वितीय तर आरती बलवंत तिरोळे ७६.७६ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल, सचिव  विकास कोटेचा, मुख्याध्यापक आर.जे.बडगुजर यांनी कौतुक केले आहे.
तसेच  राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित सर सत्यजीत राम नेमाडे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे.
यात कला शाखेचा एकूण निकाल ८७.८७ टक्के तर वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९१.८९ टक्के लागला.यात वाणिज्य शाखेमध्ये प्रथम विजय युवराज महाजन ७८.९२ टक्के, द्वितीय दिनेश निवृत्ती महाजन ७८ टक्के तर तृतीय  भाग्यश्री डिके ७५.८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
 कला शाखेत शितल रविंद्र तेली हि ७९.२३ टक्के प्रथम,  राणी मोरे ७६.४६ टक्के द्वितीय तर भारती वसंत भोई ७५.२९ टक्के मिळवून तृतीय आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनंतराव कुळकर्णी, मुख्याध्यापक आर.टी. बडगुजर यांनी  कौतुक केले आहे.
 जामठी, ता.बोदवड
 तालुक्यातील जामठी येथील चि.स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी कला शाखेचा निकाल ९३.७५  टक्के लागला. या भावना दिलीप ढवळे ही ७६.९२ टक्के मिळवून प्रथम, माया शिवाजी शिंदे ही ७६.४६ टक्के मिळवून द्वितीय तर सचिन एकनाथ कापसे ७६.३०टक्के मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*