अवकाशात होईल मानवी मुलांचा जन्म ?

0
लंडन | वृत्तसंस्था :  उंदराच्या गोठवलेल्या ‘स्पर्म’ला (वीर्य) अवकाशात सुमारे ९ महिन्यांपर्यंत ठेवले, त्यानंतर ते पृथ्वीवर आणले.

याच स्पर्मपासून उंदराच्या आरोग्यदायी पिलांचा जन्म शक्य झाला असल्याची माहिती जपानी संशोधकांनी दिली आहे. मात्र, मानवाच्या बाबतीतही असे करता येऊ शकते का? असा प्रश्‍न शास्त्रज्ञांसमोर उपस्थित होऊ लागला आहे.

जर वरील प्रश्‍नाचे उत्तर होय असे असेल तर अवकाशात गर्भधारणा शक्य आहे का? अवकाशातील शून्य ग्रॅव्हिटीमध्ये जन्मणारी मुले ही पृथ्वीवर जन्मणार्‍या मुलांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे विकसित होतील का? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत.

नासा आणि अन्य अंतराळ संस्था या २०३० च्या दशकापर्यंत लोकांना मंगळावर पाठविण्याची तयारी करत आहेत. अशा स्थितीत विशेषज्ज्ञांचे असे मत आहे की, या लाल ग्रहावर जीवनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मंगळावर लोक कसे जीवन जगतील अथवा ते कसे श्‍वास घेतील? याची काहीच कल्पना शास्त्रज्ञांना नाही. तसेच हे लोक लालग्रहावरील दोन ते तीन वर्षांच्या वास्तव्यात शक्तिशाली कॉस्मिक विकिरणाचा सामना कसे करतील?

दरम्यान, द जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑङ्ग मेडिसिन अँड हेल्थ सायन्समधील इमरजन्सी मेडिसिनचे सहायक प्रोङ्गेसर ख्रिस लेहर्ट यांच्या मते दुसर्या ग्रहावर वसती स्थापन करण्यासाठी तेथे मुलांचा जन्म होणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

LEAVE A REPLY

*