लिंबूला भाव नसल्याने शेतकरी संकटात

0
रविंद्र पाटील | गुढे | ता. भडगाव :  गेल्या महिनाभरापासून लिंबू चांगल्या प्रमाणात निघत आहे. पण लिंबूला बाजारपेठेत अपेक्षीत भाव मिळत नसल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

माल आहे पण भाव नाही अशी गत प्रथमच उन्हाळा ऋतूत शेतकर्‍यांना अनुभवाला आली आहे.

मागील वर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे हस्त बहार ऑक्टोंबर ऐवजी नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आल्यामुळे लिंबू माल जास्त आला. तो माल मार्च, एप्रिल मध्ये अपेक्षीत होता. मात्र मे महिन्यात पावसाळ्यापूर्वी जास्त निघत आहे. त्याचबरोबर ङ्गळबहार जरी जास्त निघत असला तरी लिंबू  बारीक असून तो वातावरण बदलामुळे व उशीरा बहर आल्यामुळे बारीक पडला आहे.

उन्हाळा संपण्याच्या जवळपास लिंबू निघत असल्यामुळे लिंबूला अपेक्षीत भाव मिळत नाही. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या लिंबू २० ते २५ रू. किलोने जात आहे.

पावसाळा लागल्यावर लिंबू मागणी नसते. त्यावेळी लिंबूच्या भावात मोठी घसरण असते. यावर्षी लिंबू व्यापार्‍यांनी देखील एकजूट केल्यामुळे लिंबूचे भाव उन्हाळ्यात वाढलेच नाही हा देखील एक मोठा ङ्गटका शेतकर्‍यांना बसला आहे.

आंबेबहार जोमात

यावर्षी गावरान आंब्याबरोबर सर्वच जातीच्या आंबे बहार व हंगाम जोमात असल्यामुळे सर्वदूर ङ्गळाचा राजा आंब्याचे राज असल्यामुळे आंबा स्वस्त झाला आहे.

सङ्गरचंद वगळता सर्वच ङ्गळांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन वर्षांपासून शेतीला ‘बुरे दिन’ आहेत.

शेतकर्‍यांना मार्गदर्शन

येतील गिरणा ङ्गार्मसी प्रोड्युसर कंपनीतर्ङ्गे शेतकर्‍यांना आशियाई विकास बँकेचे उपप्रकल्प संचालक (ङ्गलोत्पादन) प्रदीप पाटील यांनी लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना बाजारपेठे बाबत व शासनाच्या विविध योजनांबाबत सखमोल माहीती व मार्गदर्शन केले.शेतकरी मोठ्या कष्टाने शेतमाल पिकवतो.

पण त्याला आपला शेती माल योग्य पध्दतीने विकता येत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. येथेच सारे गणित चुकून तो हताश होतो.

पण त्याने जर शेती व्यवसाय व उत्पादीत माल कसा व केव्हा, कोठे विकावा याची जर माहीती घेतली तर शेतकर्‍यांना ‘अच्छे दिन’ येण्यास वेळ लागणार नाही असा आशावाद प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासन पणन महासंघामार्ङ्गत शेतकर्‍यांना विक्री, खेदी लायसन्स मिळवून देणे, इन्ङ्ग्रॉक्टकचर व लिंबू ग्रेडींग पॅकिंग मशनरी, शेतकरी कंपनीला उत्पादीत मालावर निधी उपलब्ध करणे, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून २०० मे.टन पर्यंत अनुदान, सबसिडी बाबत मार्गदर्शन केले. लिंबूला ब्रॅण्ड नेम मिळवून देणे आदी बाबत मार्गदर्शन केले.

याचबरोबर येथील शेतकर्‍यांची गिरणा ङ्गार्मर्स प्रोड्युसर कंपनीसाठी जागा पाहणी, शेतकरी मालाची पाहणी बरोबर बोरशा आंबा बहार पाहणी करण्यात आली.

जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे लिंबू व बोरशा आंब्याला मानांकन मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. यावेळी गिरणा ङ्गार्मस कंपनीचे संचालक प्रकाश पाटील, किसन माळी, डॉ.दिलीप महाजन, राजेंद्र भोकरे, उमेश भोकरे, कंपनीचे सीईओ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*