आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य

0
मलकापूर |  प्रतिनिधी :  तालुक्यातील बेलाड व विवरा येथील शेतकर्‍यांनी सततची नापिकी व दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना गत सप्ताहात घडल्या त्यांच्या कुटूंबियांना शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळण्यापुर्वी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी रोख दहा-दहा हजाराची मदत केली.

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील प्रशांत प्रल्हाद झांबरे तर विवरा येथील नारायण श्रीराम पाटील या दोघा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबियांना दि.२८ रोजी माजी मंत्री सुबोध सावजी त्यांचे पुत्र शैलेश सावजी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिलीप देशमुख, न.प. उपाध्याक्ष हाजी रशिदखॉं जमादार, शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आरोग्यसभापती राजु पाटील, गजानन ठोसर, माजी नगरसेवक सुनिल बागडे, पत्रकार मनोज पाटील आदींन ग्राम बेलाड येथे संबारे कुटूंबियास भेट दिली.

माजी मंत्री सुबोध सावजींनी प्रशांत संबारे यांच्या आई प्रमिलाबाई यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. परिवाराचे दुःखातून सावरण्यासाठीच आम्ही आले असून शासनाच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहे म्हणून तात्काळ शेतकर्‍यांना कर्जमुक्ती साठी आम्ही शासनासी भांडत असल्याचे सांगुन मदत स्वीकारण्याची विनंत सुबोध सावजी यांनी केली.

यावेळी निंबाजी संबारे, रविंद्र संबारे, मनोज जंगले, शंकरराव संबारे, रामेश्‍वर संबारे, नारायण संबारे, उमेश संबारे उपस्थित होते.

तर विवरा येथे नारायण श्रीराम पाटील यांच्या कुटूंबियांना रोख दहा हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी अजय पाटील, राजेंद्रसिंग राजपूत, प्रभाकर कडू, मधुकर कडू, गोविंदा बोरोले, दिनकर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*