बाहुबलीच्या कटप्पा विरोधात फर्दापुर पोलिसात तक्रार 

0
 अभय लोढा | वाकोद ता. जामनेर : सर्वत्र बहुचर्चित असलेला व सर्वानाच आकर्षित केलेल्या बाहुबली 2 सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस राजमौली व अभिनेता सत्यराज यांच्यावर अॅट्रासीटी कायद्यान्वये कार्यवाही होण्यासाठी  फर्दापुर येथील  अखिल भारतीय संतूजी बिग्रेडचे  औरगाबाद जिल्हा सरचिटणीस आनिल रावळकर  यांनी फर्दापुर  पो. स्टे ला स. पो. नि निमीष मेहेत्रे  यांच्याकडे अर्ज देवून कार्यवाहीची मागणी केली आहे
  सविस्तर वृत्त असे की, बाहुबली2 या चित्रपटातील एका दृश्यामध्ये कटप्पाचा तोडी  “कटीका चाॅकाती असा शब्द प्रयोग वापरण्यात आला आहे या शब्दाचा अर्थ खाटीक जात एक कंलक आहे असा होतो
सार्वजनिक ठिकाणी खाटिक जातिचा असा उल्लेख करून हिनवने आहे यामुळे माझ्या व माझ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत .
  पारंपारिक व पिढ्यानपिढ्या खाटिक समाज मास विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजिवीका भागवत आहे बाहुबली2 चित्रपटामध्ये मात्र खाटिक जातीला व अमानुष दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तो सार्वजनिक रित्या चित्रपट गृहातून सामाजिक हिनवण्याचा प्रकार आहे
यामुळे खाटिक समाजाची बदनामी होत असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अॅट्रासीटी कायद्यान्वये अनुसूचित जातीला किंवा आदिवासी जमातीचा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करून हिनवने हा गुन्हा आहे जो सत्यराज एस. एस राजमौली यांनी केला आहे
त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रासीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती आनिल रावळकर  यांनी आपल्या अर्जात केली आहे.

LEAVE A REPLY

*