सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा सावकारीकडे – सहकार राज्यमंत्री ना.पाटील

0

जळगाव |  प्रतिनिधी  :  राज्यातील सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा सावकारीकडे जात असल्याची टिका सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथे केली. दरम्यान एक जुननंतर शेतकर्‍याची अवस्था अधिकच बिकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेची जिल्हा बैठक आज सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अंध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सरकारने शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. अधिवेशनातही हीच मागणी आम्ही लावुन धरली होती

तसेच नाशिक येथे झालेल्या कृषी अधिवेशनातही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्जमुक्तीसंदर्भात सरकारला ठणकावले आहे. असे असतांनाही सरकार अद्याप कुठलाही निर्णय घेत नाही. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पुन्हा सावकारीकडे जात असुन तीन टक्के व्याजाने तो पैसा उचलत असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शेतकर्‍यावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. तो मुका आहे बोलु शकत नाही. येत्या एक जुननंतर शेतकर्‍याची अवस्था आणखीनच बिकट होणार असुन शेतकरी थांबला तर या सरकारलाही कळेल असे त्यांनी सांगितले.

दाऊद प्रकरणाची चौकशी होऊन जाऊ द्या

नाशिक येथे कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या नातेवाईकाच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी हजेरी लावली होती. कुणी पत्रीका बघुन लग्नाला जात नसतो. परंतु या विषयाच्या चौकशीचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

त्यामुळे जशी भोसरीची चौकशी सुरू आहे तशी ही पण चौकशी होऊन जाऊ द्या म्हणजे ‘दुध का दुध, पानी का पानी’ समोर येईल असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*