यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक लाच घेतांना गजाआड – धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0
जळगाव | प्रतिनिधी :  यावल वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुर्यकांत चावदास नाले यांना तक्रारदारांकडून १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. त्यांनी डिसेंबर२०१६ ते मार्च २०१७ पर्यंत त्यांच्या वनपरिक्षेत्रात विविध शासकीय कामे केलेली असून तक्रारदार यांचे वरिष्ठ अधिकारी सुर्यकांत नाले यांनी शासकीय कामे त्यांच्या सहीने वरिष्ठांकडे पाठविली होती.

त्यांच्या सहीमुळे ही कामे मंजुर होवून शासनाकडून ५० ते ५५ लाख रुपयांचा निधी तक्रारदार यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्याने तक्रारदार यांनी कामे केली आहेत.

सहाय्यक वनसंरक्षक सुर्यकांत नाले यांनी तक्रारदार यांना मंजुर शासकीय निधीचे ४ टक्के प्रमाणे १ लाख ७३ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार याने लेखी तक्रार केली.

त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर सुर्यकांत नाले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख ८२ हजारांची मागणी केल्याचे निपष्ण झाल्याने यावल वनविभागाच्या जळगाव कार्यालयात सापळा रचून सुर्यकांत नाले यांना तक्रारदार यांच्याकडून १ लाख ८२ हजारांची लाच स्विकारतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

LEAVE A REPLY

*