टोमॅटोमध्ये कर्करोगरोधक गुण

0
रोम | वृत्तसंस्था : एके काळी विषारी ङ्गळ मानल्या जाणार्या टोमॅटोने आता जगभरातील लोकांच्या आहारात अचल स्थान मिळवले आहे. टोमॅटोमध्ये काही औषधी गुणही आहेत, हे वेळोवेळी दिसून आले आहे.

आता संशोधकांनी म्हटले आहे की, टोमॅटोत कर्करोगविरोधी गुणही असतात. टोमॅटोचा अर्क हा पोटाच्या कर्करोगाला अटकाव करतो, असे निष्पन्न झाले आहे.

अमेरिका व इटलीतील वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून त्यात टोमॅटोच्या सॅन मारझानो व कोरबारिनो या प्रजातींचा वापर करण्यात आला. या टोमॅटोमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते व त्यांच्या वाढीस अटकाव होतो.

साब्रो इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॉलिक्युलर मेडिसिनचे प्रा. अँटानिओ गिओरदानो व त्यांच्या सहकार्यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, त्या देशात पोटाच्या कर्करोगाचे दरवर्षी २८ हजार रुग्ण आढळतात. आतड्याचा कर्करोग, पोटाचा कर्करोग हे साठ टक्के प्रौढांत दिसून येतात तर ६५ टक्के प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येतात.

आधीच्या अभ्यासानुसार टोमॅटोतील लायकोपिन हे कॅरेटेनॉइड टोमॅटोला लाल रंग आणीत असते. त्यामुळे कर्करोगाशी सामनाही करता येतो.

प्रा. गिओरदानो व त्यांच्या सहकार्यांनी टोमॅटोचे कर्करोगविरोधी गुणधर्म तपासले असून टोमॅटोच्या अर्काने कर्करोग पेशी मरतात, असे दिसून आले.

LEAVE A REPLY

*