सरकार विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करणार: खा. अशोक चव्हाण

0

मुंबई / देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणार्‍या भाजप सरकारविरोधातील संघर्ष काँग्रेस पक्ष आणखी तीव्र  करणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

मुंबईच्या आझाद मैदानात मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या जनविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसने आयोजीत निषेध सभेत खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारला कुठलेही आर्थिक नियोजन राहिले नसून बेसुमार करवाढ केली जात आहे. मंत्यार्ंच्या परदेश दौर्‍यावर आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असून करवाढ करून त्याचा बोजा सर्वसामांन्यावर टाकला जातोय.

देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात आहे. करवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

मोदी सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे या तीन वर्षात त्यांनी देशातील जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मनमोहन सिंग सरकारने सुरु केलेल्या कामाची उद्धाटने मोदी करित आहेत.

देशात हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न असून सरकारविरोधात बोलणार्‍यांवर खोट्या केसेस टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

 

LEAVE A REPLY

*