गिरीश महाजनांनी राजीनामा द्यावा – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे |  प्रतिनिधी :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

ज्या पक्षाने दाऊद इब्राहिम आणि शरद पवार यांचे संबध असल्याचे आरोप करत रान पेटवले, त्यांचे मंत्री गिरीश महाजन हे दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात. ही गंभीर चूक असून महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

ज्यावेळी कोणताही मंत्री एखाद्या लग्नास किंवा कार्यक्रमाला जातो, त्यावेळी पोलीस आयुक्त कोणाचा कार्यक्रम आणि त्याठिकाणी कोणाची उपस्थिती आहे, याबद्दलची माहिती देतात.

गिरीश महाजन यांना लग्न कोणाचे होते याबद्दलची माहिती दिली नव्हती का, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गृहखाते कोणती कारवाई करणार?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्न समारंभ नाशिकमध्ये १९ मे रोजी पार पडला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे या जंगी विवाह सोहळ्यास लोकप्रतिनिधींसह बुकी आणि अन्य मान्यवर मंडळींसह पोलिसांनी हजेरी लावली. त्यामुळे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते नेमकी कोणावर कोणती कारवाई केली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॉंग्रेसकडूनही चौकशीची मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन-तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी केली आहे.

एकनाथ खडसेंना एक न्याय आणि गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी?, असा खोचक सवालही सावंत यांनी केला.

LEAVE A REPLY

*