जळगाव मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्ड रचना तयार करण्याची लगबग

0
जळगाव |  प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट २०१८ मध्ये होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वॉर्ड रचना तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असून गुगल मॅप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वॉर्डाची सिमारेषा निश्‍चित करण्यात येत  आहे.

आगामी मनपा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शहराच्या नकाशावरुन सिमारेषा निश्‍चित करण्यात आल्या होत्या.

मात्र यावर्षी गुगल मॅपवरुन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सिमारेषा निश्‍चित करण्यात येत आहे. मनपाच्या नगररचना विभागात गेल्या आठ दिवसापासून वॉर्ड रचना तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

शहरातील चारही प्रभाग समितीच्या वॉर्डांमधील सिमारेषा निश्‍चित करुन सिमांकन केल्यानंतर शासनाकडे तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्डरचना फुटल्याने तत्कालीन उपायुक्तांना निलंबित करण्यात आले होते. मात्र आता यावर्षी सिमांकन निश्‍चित झाल्यानंतर शासनाकडूनच वॉर्ड रचना तयार केली जाणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

LEAVE A REPLY

*