राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त नीलेश भिलच्या अपहरणाचा संशय : मानेगावचा आदेश बाबा गजाआड

0

मुक्ताईनगर |  वार्ताहर :  नरबळीच्या संशयावरुन मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथील आदेशबाबा यांचे हिंगणा शिवारातील शेतात असलेल्या घरात पोलीसांनी छापा टाकला असता काही हत्यारे, पुजेचे साहित्य, नोटा, नोटांच्या आकाराचे कोरे कागदांचे बंडल व कवटी आढळुन आल्याने आदेशा बाबांसह इतर तिघांना चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान एका बाहेरील भावना असल्याने त्यास मंत्रोच्चारासाठी आदेश बाबाकडे आणले असल्याचे समजते. मुक्ताईनगर व बोदवड पोलीस पथकाने ही कारवाई रात्री १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान केली.

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल व त्याचा लहान भाऊ यांचा अपहरण झाले असून या प्रकरणी आदेशबाबांची कसून चौकशी केली जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल हा त्याचा भाऊ गणपत यांचे दि. १८ रोजी पहाटेपासुन अपहरण झाल्याची फिर्याद मुक्ताईनगर पोलिसात दाखल असून त्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस प्रशासन रात्रंदिवस ‘त्यांचा’ शोध युध्द पातळीवर अतिशय जलद गतीने करीत आहेत.

त्याच दृष्टीने, मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील येथील आदेश बाबा उर्फ भिवसन सखाराम गोपाल (महाजन) यांचेवर काही वर्षांपुर्वी नरबळीचा गुन्हा दाखल आहे. त्या संशयावरुन व पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मुक्ताईनगर व बोदवडच्या पोलीस पथकाने हिंगोणा येथील आदेशबाबा यांच्या शेतातील घरी रात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता सदर ठिकाणी लोखंडी सळयांनी गोल रिंगण केलेले.

त्या रिंगणात नारळ, हळद, कुंकू, लिंबू, पाढंरा कापड, ४ नारळ, तिथेच एक कवटी तसेच पाचशेच्या काही नोटा व काही नोटांसारखे कोरे कागदांचे बंडल आढळुन आले.

दरम्यान, या कारवाईत घरातून पोलीसांनी एक तलवार, एक चाकू, एक कोयता, ४ नारळ, लिंबू, लोखंडी सळ्या, कवटी, (सदर कवटी माकडीची असल्याची समजते) पांढरा कापड, पाचशे, शंभर व दहाच्या नोटांचे व कोरे कागदांचे बंडल ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे साडेचार ते पाच लाखांच्या जवळपास रक्कम व मुद्देमाल आढळुन आल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

नरबळीचा संशय

गेल्या काही वर्षांपुर्वी मालेगाव येथील आदेशबाबा याचेवर नरबळीचा व पैशांचा पाऊस पाडण्याचा गुन्हा दाखल होता. त्यावरुन अपहृत मुलांच्या तपासाच्या अनुषंगाने संशयावरुन व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुक्ताईनगरचे पोनि अशोक कडलग, एपीआय हेमंत कडूकार, तपासाधिकारी पोउनि वंदना सोनुने, तसेच बोदवडचे पोनि सी.डी.बनकर, बोदवडचे पोलीस पथक, तसेच मुक्ताईनगरचे पोकॉ नाईक, संतोष नागरे, कांतिलाल केदारे, सी डी पाटील, संभाजी बिजागरे, नमायते, अभिजीत सैंदाणे आदींतर्फे सापळा रचुन संशयीतांना ताब्यात रात्री ३.३० ते ४ वाजे दरम्यान पोलीसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांतर्फे आदेशबाबा उर्फ भिवसन सखाराम गोपाळ (महाजन) याचेसह धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथील अजय बैसाणे, सागर सोनवणे, कैलास शिरसाठ अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान शिरपुर येथील तिघेही रुग्णास बाहेरील भावना असल्याने मंत्र उपचारार्थ घेऊन आल्याचे समजते.

या घटनेमुळे मात्र सर्वत्र चर्चेस उधाण आले आहे. कारवाईने तपासाची दिशा ठरते काय? गेल्या १८ मे पासुन कोथळी येथुन अपहरण झालेल्या दोघं भावांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.

त्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातर्फेही संबंधीत विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. परंतु नेमका धागा सापडत नसल्याने तपासकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान या संदर्भात बोदवडकडे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस अधिकार्‍यांचे नेतृत्वात कारवाई – बोदवड तालुक्यातील हिंगणे येथील कारवाई जळगावचे पोलीस अधिकारी कराळे यांचे मार्गदर्शनाखाली तर मुक्ताईनगरच्या नव्याने डि वास एस पी म्हणुन रुजू झालेले सुभाष नेवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

दोन्ही पोलीस अधिकार्‍यांनरी पथकांची निर्मिती करुन, संशयावरुन सापळा रचुन आदेशबाबाला ताब्यात घेतले. मंत्रतंत्राचा वापर करणाच्या कारणावरुन अंधश्रध्दा निर्मुलन कायदा कलम अंतर्गत गुन्हा तसेच त्याचेजवळ ५ लाख ४६ हजार रुपये मिळुन आल्याने बोदवड पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुक्ताईनगरचे डिवायएसपी सुभाष नेवे यांनी दिली. पोलीस पथकात अतुल बोदडे व चौधरी यांचाही समावेश होता.

आमदारांकडून अभिनंदन

दरम्यान पोलीसांच्या या कारवाईचे कौतुक व अंभिनंदन मुक्ताईनगरचे आ. एकनाथराव खडसे यांनी केले. आ. खडसे यांनी पोलीस पथकासह डिएसपी व मुक्ताईनगरचे डिवायएसपी सुभाष नेवे यांचेही अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*