विभागीय आयुक्त न आल्याने बैठक रद्द

0

जळगाव । नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर येवून जिल्हा परिषदेमार्फेत राबविलेल्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेणार होते. परंतू आयुक्त झगडे जळगाव दौर्‍यांवर न आल्याने बैठक रद्द करण्यात आली.

झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोझल या विषयावर सकाळी 11 वाजता कार्यशाळा व दुपारी 2.30 वाजता जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या कार्याचा आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या शाहु महाराज सभागृहात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

सकाळच्या कार्यशाळेला आयुक्त झगडे न आल्याने बैठक होईल की नाही याबाबत सांशकता होती.आयुक्त महेश झगडे दुपारीच्या बैठकीत येतील असे अधिकारी सांगण्यात येत होते.

त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाहु महाराज सभागृहात बैठकीचे नियोजन करण्यात आले. परंतू आयुक्त झगडे जळगावात आलेच नसल्याने जिल्हा परिषदेतील आढावा बैठक रद्द करण्यात आली.

LEAVE A REPLY

*