दलितवस्ती सुधार योजनेतंर्गत 774 गावांचे प्रस्ताव

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फेत राबविण्यात येणार्‍या दलितवस्ती सुधारयोजनेतंर्गत जिल्ह्यातील 774 गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून लवकरच या गावांना निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी दिली.

कृती आराखडयात 5 वर्षासाठी दलितवस्ती सुधारयोजनेतंर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला 54 कोटी मंजूर झाले आहे.

दलितवस्ती सुधारयोजनेंतर्गत भुमिगत गटारी, पोहच रस्ते, समाजमंदिर, पाण्याची टाकी, सार्वजनिक शौचालयांची कामे करण्यात येतात. निधी मोठया प्रमाणात शिल्लक असल्याने समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी सर्व ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिले आहे.

त्यानुषंगाने 774 गावांनी दलितवस्ती सुधारयोजनेतंर्गत कामांसाठी प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर केले आहे. दरम्यान या 774 गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*