दै.‘देशदूत’,पातोन्डेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ‘सचिन’ चित्रपट पाहण्याची संधी

0
जळगाव  / दै.‘देशदूत’ आणि पातोन्डेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ‘सचिन अ बिलियन्स् ड्रीम्स्’ (मराठी) चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
क्रिकेट विश्वातील एक महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स्’ चित्रपट उद्या दि.26 रोजी प्रदर्शित होणार आहे.
लाखो देशवासियांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महान क्रिकेट सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स्’ हा चित्रपट उद्या देशभरात प्रदर्शित होत आहे.
सचिन या चित्रपटाची उत्सुकता व उत्कंठा अवघ्या तरुणाईला लागलेली आहे. खान्देशातील अग्रगण्य दैनिक ‘देशदूत’ आणि सोन्याच्या दागिन्यांचे होलसेल व्यापारी पातोन्डेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स्’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

देशातच नव्हे तर अवघ्या जगात सचिन नावाच गारुड तरुणाईच नव्हे तर अबालवृध्दांना देखील मोहून टाकत आहे. आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीत सचिन तेंडुलकर यांना आलेले चढउतार, अनुभव या चित्रपटात दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो सचिन प्रेमी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्कंठता लागून राहिली आहे.

हाच धागा पकडून दै.‘देशदत’ व पातोन्डेकर ज्वेलर्सने जळगावातील अवघ्या सचिनप्रिय विद्यार्थ्यांसाठी चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दै.‘देशदूत’चे व्यवस्थापक मनीष पात्रीकर (मो.नं. 9822753204), किरण पातोन्डेकर (मो.नं. 9860833471) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*