बसच्या धडकेत विद्यार्थीनी जागीच ठार

0

मलकापूर । ग्राम नरवेल येथे बस चालकाने निष्काळजीपणाने बसस्थानकावर बस वळविल्याने अकरा वर्षीय विद्यार्थीनी मागील चाकाखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दि. 5 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली.

दि. 5 डिसेंबर 17 रोजी सकाळी 10 वाजता धरणगाव येथील शाळेत जाण्याकरिता म्हैसवाडी येथील कु.संजना गजानन लोणे (वय 11) ही विद्यार्थीनी नरवेल बसस्थानकावर उभी होती.

त्याच दरम्यान मलकापूर आगाराची बस क्र. एमएच 20 डि 9378 ही बस चालकाने भरधाव व निष्काळजीपणे बस स्थानक आवारात मागे वळविली यात कु.संजना हिला बसची धडक बसली त्यात डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यु झाला.

या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी बसची तोडफोड केली व बस पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र ती पेटत नसल्याचे पाहून काही ग्रामस्थांनी बसखाली तुरखाट्या व लाकडे टाकून पेटविण्याच्या प्रयत्न केला.

दरम्यान घटनास्थळी दसरखेड ग्रामीण पो.स्टे.चे पोनि माधवराव गरूड, पोकाँ संजय निंबोळकर, आनंद माने व मोहनसिंग राजपूत यांनी दाखल होवून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गिरिश बोबडे यांनी भेट दिली. मयत विद्यार्थीनीचे आई वडिल मनुदेवी दर्शनासाठी गेले असल्याने घटनेची फिर्याद विकास धाडे यांनी दिल्यावरून पोलिसांनी बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

मयत मुलीचे शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणले असता विविध राजकिय पदाधिकार्‍यांनी व नरवेल ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

दरम्यान मयत विद्यार्थीनीच्या नातेवाईक तसेच मलकापूर व बुलढाणा एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ मदत म्हणून रोख दहा रूपये दिले.

LEAVE A REPLY

*