ट्रॅक्टरवरुन पडल्याने 15 वर्षीय बालकाचा मृत्यू

0

जळगाव । तालुक्यातील पिलखेड येथील शेतात सुरु असलेल्या कामावेळी टॅ्रक्टरवरून पडल्याने 15 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पिलखेड शिवारात क्रांतीलाल चौधरी यांचे शेत आहे. शेतीचे काम सुरु असल्याने त्यांचा मुलगा कार्तिक क्रांतीलाल चौधरी वय 15 हा देखील शेतातच होता.

दुपारी तो घरी जेवणासाठी गेला, त्यानंतर त्याने वडीलांचा डब्बा शेतातच आणला. त्यानंतर तो शेतात काम करीत असलेल्या टॅ्रक्टरवर बसला होता.

ट्रॅक्टरचे शेतात काम सुरु असतांना तो अचानक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात येवून कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

LEAVE A REPLY

*