पारोळा पालिकेची मुख्य बाजार पेठेत ‘हातगाडी हटाव’ मोहीम

0
पारोळा, |  प्रतिनिधी : येथील मुख्य बाजार पेठेत हातगाडीधारकांमुळे रहदारीला मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने पारोळा नगरपालिका प्रशासनाने हातगाडी हाटाव मोहिम दिनांक २९ रोजी सकाळ पासुन सुरूवात केली या मोहिमे मुळे नागरीकांनी न .पा .प्रशासनाचे कौतुक केले असून किती दिवस हि मोहिम सुरू असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

शहारातील बाजार पेठेत भाजी विक्रीत्यांनी रस्त्यावर हातगाडी लावून मोठया प्रमाणात अतिक्रमण केले होते. दुकानदारानी आपली दुकाने पुढे थाटल्याने रस्त्यावरील भाजीपाला घेण्यासाठी येणार्‍या नागरीकांना विशेषत: महिलांना या मुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता तर काहि वेळा हातगाडी धारक व नागरीकांची अनेक वेळा तु तु मै मै झालेली आहे.

तर अनेकांनी हाणामार्‍या पण बघितल्या आहे अनेक वेळा तक्रारी करून देखील नगरपालिकेने काना डोळा देखील केलेला आहे परंतु दिवसा गणिक हातगाडी विक्रेत्याची संख्या वाढत असल्याने रहदारीला मोठया प्रमाणात अडचण निर्माण झाल्याने नगरपालिका प्रशासनाने पोलिस बदोबस्तात हातगाडी हाटाव अतिक्रमण काढण्यास दि .२९ सकाळ पासुन सुरूवात केली.

नंपा कर्मचार्‍यांना ट्रॅकर मध्ये हातगाडया भाजी विक्री करणार्‍यांचेे लोखडी टेबल ,सावली साठी लावलेले परदे या सह विविध वस्तु ट्रॅक्टर मध्ये टाकली जात होती या मुळे भाजी विक्रीते व अतिक्रमण हटविणार्‍या कर्मचार्‍यांंमध्ये तु तु मै मै झाली परंतु कर्मचार्‍यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अतिक्रमण मोहिम सुरूच ठेवली. या मुळे बाजार पेठेत बघ्याची गदीॅ मोठया प्रमाणात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बदोबस्त वाढविण्यात आला होता.

हि मोहिम यशस्वी करण्या साठी मुख्याधिकारी सचिन माने, यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एन. घुले, तुकडू नरवाळे ,प्रकाश पाटील, किशोर चौधरी, एच.एम पाटील, अभिजीत मुंदणकर, विजय शिंपी ,संदिप पाटील,राजु मोरे, किशोर उमप, डि. ए. बिर्‍हाडे, भैय्या पवार, सुभाष थोरात, सुनिल कुलकर्णी, अनिल नरवाळे व कर्मचारी होते.

आमदार साहेब वाढदिवसाची भेट आहे का?

दि २९ रोजी पारोळयात अतिक्रमण काढण्याच्या नावाने गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिका माल व साहित्य जमा करून छळ करते आहे. आमदारसाहेब हि आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी मिळालेली भेट आहे की काय? रोखून दाखवा गरीबांना त्रास देण्याचा प्रयत्न. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आमचा विरोध नाही.

पण खरे अतिक्रमण कोणी आशिर्वाद देवुन पक्के दूकान इमारती टपर्‍या ठेवून केलेली आहेत.ती काढायला लावाल का ? सोयीसाठी एकत्र आलात ना? विरोध करून दाखवा. तुम्ही शेतकरी सह संघाच्या निवडणुकीत केलेल्या तथाकथित युतीचे बहूमत आहे.द्या उत्तर….!
अमोल पाटील कृ.उ.बा समिती सभापती

LEAVE A REPLY

*