ऑनलाईन पोर्टल औषध विक्रीच्या निषेधार्थ ३० रोजी जिल्ह्यातील मेडीकल बंद

0
जळगाव | प्रतिनिधी :  ऑनलाईन पोर्टलवर औषधांची विक्री करण्यात यावी असे शासनाने ठरविले आहे. या ऑनलाईन पोर्टलला एमएससीडीए तसेच जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनने विरोध केला असून या ऑनलाईन पोर्टल औषण विक्रीच्या निषेधार्थ दि.३० रोजी जिल्हयातील मेडीकल बंद राहणार असल्याची माहिती एमएससीडीएचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेडीकल असोसिएशनने शासनाच्या जीएसटी निर्णयाचे स्वागत केले असून जीएसटीला पाठींबा दर्शविला आहे. त्या अनुषंगाने सदस्यांना आज जीएसटीबाबत सेल्स टॅक्सचे असिस्टंट कमिशनर के.के. महाजन, बापुसाहेब बावीस्कर यांनी मार्गदर्शन केले.

तसेच शासनाकडून जेनेरीक औषधीचा गवगवा करण्यात येत आहे. जेनेरीक औषधींना विरोध नसून राज्यशासनाने जेनेरीकच्या औषधी फुड ऍण्ड ड्रग्ज विभागाकडून तपासून घ्यावी असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे विरोधकांनी संघटनेवेळ केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेवेळी अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*