अज्ञात वाहनाच्या धडकेत पुलावरुन रिक्षा कोसळली

0

जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-राष्ट्रीय महामार्गावरील शिवकॉलनी पुलाजवळ समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षा पुलावरून कोसळून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास घडली. याअपघातात रिक्षेचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळ्यातील सागर कोळी हे त्यांच्या मालकीची रिक्षा क्रमांक एमएच 19 जे 6829 ने शहराकडून पिंप्राळयाकडे जात असतांना समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षेला जोरदार धडक दिली.

या धडकेत रिक्षा पुलाच्या खाली कोसळून चक्काचूर झाली असून रिक्षाचालक सागर कोळी हा जखमी झाला. अपघातानंतर काहीवेळ याठिकाणी वाहतुक विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

*